भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात सपाटून मार खाल्ला आणि १०० धावांच्या अंतराने सामना गमावला. या सामन्यात भारताच्या इतर फलंदाजांप्रमाणे विराट कोहली हादेखील मोठी खेळी करू शकला नाही. परंतु लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर फलंदाजीला येण्यापूर्वी ड्रेसिंग रूममधून तो ज्या अदबात चालत आला, त्याची चाहत्यांना भुरळ पडली आहे.
लॉर्ड्स क्रिकेटने (Lords) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट (Virat Kohli) लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित पव्हेलियनमधून फलंदाजीसाठी बाहेर येताना दिसत आहे. खराब फॉर्म, लोकांची टीका, संघातील जागेवर प्रश्नचिन्ह, कशाचाही ताण न घेता विराट आत्मविश्वासाने फलंदाजीसाठी जाताना दिसत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जातो. ड्रेसिंग रूममधून (Lords Dressing Room) बाहेर आल्यानंतर तो पायऱ्यांवरून खाली उतरताना आपली कॉलर वर करतो आणि मग मैदानाच्या दिशेने निघून जातो. विराटच्या या स्टाईलला (Virat Kohli Walks Out To Bat) चाहते खूप पसंती दर्शवत आहेत. त्याच्या या व्हिडिओला एका दिवसात ७५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/Cf__AOSqzga/?utm_source=ig_web_copy_link
रोहित विराटच्या पाठीशी उभा
दरम्यान विराट २०१९ पासून एकही शतक करू शकला नाही. त्याचे सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातील प्रदर्शन जरी पाहायचे झाले तर, त्याने अनुक्रमे ११, २०, १, ११ आणि १६ धावा केल्या आहेत. त्याचे हे निराशाजनक प्रदर्शन पाहता अनेकांनी त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही त्याच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे.
विराटची पाठराखण करताना तिसऱ्या वनडे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, “विराट अनेक सामने खेळला आहे. इतकी वर्षे तो खेळत आहे. तो इतका महान फलंदाज आहे, त्याला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही. मागच्या पत्रकार परिषदेतही मी हेच बोललो होतो. फॉर्म येतो आणि जातो, हा कोणत्याही क्रिकेटरच्या करिअरचा भाग असतो. त्यामुळे इतकी वर्षे खेळणाऱ्या, इतक्या धावा करणाऱ्या कोहलीसारख्या खेळाडूने सामने जिंकले. त्याला फक्त एक किंवा दोन चांगल्या खेळींची गरज आहे, ही माझी विचारसरणी आहे आणि मला खात्री आहे की जे क्रिकेट फॉलो करतात त्यांची मानसिकता सारखीच आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिंगापूर ओपन २०२२: सायना, प्रणोय फेल तर सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक
‘या’ ४ भारतीय दिग्गजांप्रमाणे खराब फॉर्मशी झगडत असलेला विराटही अचानक टाकणार निवृत्तीचा ‘बॉम्ब’!
आयपीएलचे जनक ललित मोदींची संपत्ती माहितीय का? गर्लफ्रेंड सुष्मिता सेनची कमाई वाटेल चिल्लर!