भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. पण या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli), दोघेही फ्लाॅप ठरले होते.
विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या डावात 6 धावा आणि दुसऱ्या डावात 17 धावा करून तो तंबूत परतला. कानपूर कसोटीपूर्वीही कोहली बॅटिंग फॉर्ममध्ये परतलेला नव्हता. बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कानपूरमध्ये फलंदाजीचा सराव करताना कोहली अनेकदा बाद झाला.
विराट कोहली (Virat Kohli) कानपूरमध्ये फलंदाजीच्या सरावात वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांविरुद्ध फलंदाजी करताना दिसला. मात्र, दोन्ही गोलंदाजांसमोर कोहलीची बॅट चालली नाही. कोहलीने नेटमध्ये बुमराहचा सामना केला. कोहली सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्यानंतर बुमराहने कोहलीला तीन वेळा बाद केले. फिरकीपटूंविरुद्ध कोहलीची नेटमध्ये खराब फलंदाजी सुरूच होती. बुमराहनंतर कोहलीचा सामना अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विनशी झाला. मात्र, अवघ्या काही चेंडूंनंतर कोहली आक्रमक फलंदाजीमुळे अक्षर पटेल आणि अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (27 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर) दरम्यान कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी जो संघ होता, तोच संघ रिटेन केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू रोहित-विराट कशी कामगिरी करतात हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.
बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीबद्दल शिखर धवनचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या दोन वर्षांत…”
IND vs BAN: टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची कधी होणार घोषणा?
IPL 2025 Retention Update: किती खेळाडूंना रिटेन करता येणार?