---Advertisement---

विराट कोहलीच्या बाबतीत असे दुसऱ्यांदाच घडले!

On: शनिवार, जून 30, 2018 7:27 AM
---Advertisement---

डब्लिन। भारतीय संघाने आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 143 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिकेत आयर्लंडला 2-0 ने व्हाईटवॉशही दिला.

या मालिकेत विजय मिळवून भारताने आयर्लंड-इंग्लंड दौऱ्याची (यूके दौरा) शानदार सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी या दौऱ्याची सुरुवात वयक्तिकरित्या चांगली झालेली नाही.

त्याला आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात एकही धाव करता आली नव्हती तर दुसऱ्या सामन्यात त्याला फक्त 9 च धावा करता आल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस त्याला आयर्लंडचा गोलंदाज पीटर चेसने बाद केले आहे.

विराटला आतंरराष्ट्रीय टी20 मध्ये एकाच गोलंदाजाने सलग दोन सामन्यात बाद करण्याची ही फक्त दुसरीच वेळ आहे.

याआधी असे 2012 मध्ये झाले होते. जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा 2 सामन्यांच्या टी20 मालिकेत विराटला इंग्लंडचा मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट मीकरने सलग दोन सामन्यात बाद केले होते.

विराट पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 59 सामन्यात 48.58 च्या सरासरीने 1992 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 अर्धशतके केली आहेत.

भारतीय संघ आता 3 जुलै पासुन इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप 5: दुसऱ्या टी20 मध्ये भारतीय संघाने केले हे खास विक्रम

एमएस धोनीला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात स्थान नाही!

टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment