गुरुवारी (08 सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहलीने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने 61 चेंडूत 12 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक आहे. कोहलीने त्याच्या खेळीचा खूप आनंद घेतला. फलंदाजी करताना तो नाचतानाही दिसला.
वास्तविक, भारताच्या डावाच्या 17व्या षटकात, डीजेने बॉलीवूडचे प्रसिद्ध गाणे “सादी गली” मैदानात वाजवले. त्यावेळी क्रीझमध्ये फलंदाजी करत असलेला कोहली गाण्याच्या तालावर हळू हळू नाचू लागला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो खूपच आरामशीर दिसत असून त्याच्या फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे दिसून येते. तो कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली असल्याचे दिसत नाही. नाचत असताना, पुढच्या चेंडूवर कोहलीने लेग साइडलाही फ्लिक केले आणि शानदार चौकार मारला.
Virat Kohli has a little boogie to "Sadi Galli" in between balls 🕺 pic.twitter.com/RN8yGlA0Qk
— Aatif Nawaz (@AatifNawaz) September 8, 2022
यासह कोहली आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी सुरेश रैना (1), रोहित शर्मा (4), केएल राहुल (2), दीपक हुडा (1) आणि सूर्यकुमार यादव (1) यांनी ही कामगिरी केली आहे. कोहलीची 122* धावसंख्या ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीयांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या (118) नावावर होता, जो त्याने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध केला होता.
भारताने मोठा विजय नोंदवला
प्रथम खेळताना भारताने निर्धारित 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. कोहलीच्या शतकाशिवाय केएल राहुलने अर्धशतक (62) झळकावले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या संघाला पूर्ण षटके खेळूनही आठ गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक
दुलिप ट्रॉफी 2022: यशस्वी जयसवालचे फर्स्ट ‘क्लास’ द्विशतक, कॅप्टन रहाणेही दिसला फॉर्ममध्ये
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते