भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आधी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत, आणि आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत. रविवारी (दि. 15 जानेवारी) भारताने श्रीलंकेला वनडे मालिकेत अखेरच्या सामन्यात पराभूत करत मालिका 3-0ने खिशात घातली. मालिकेच्या अखेरच्या सामन्यात एकापेक्षा एक विक्रम नोंदवले गेले. भारताने श्रीलंकेला या सामन्यात तब्बल 317 धावांनी पराभूत केले. हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्या शतकी खेळीचा मोलाचा वाटा होता. विराटचे हे मालिकेतील दुसरे शतक होते. अशात आता विराट कोहलीचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
खरं तर, सन 2019पासून विराट कोहली (Virat Kohli) याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नव्हते. मात्र, 2022मध्ये विराटने हा वनवास संपवला. आशिया चषकात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील पहिले शतक झळकावत शतकांचा वनवास संपवला. त्यानंतर आता विराटच्या एका पाठोपाठ एक अशा शतकांचा रतीब सुरू झाला आहे. मागील चार वनडे सामन्यात विराटच्या बॅटमधून तीन शतके निघाली आहेत. ‘रनमशीन’ विराटने 74वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केल्यानंतर आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघासाठीचा विराटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विराट त्याच्या कठीण काळातून बाहेर पडण्याबाबत बोलत आहे.
‘एका शतकानंतर सलग शतके’
विराटने या व्हिडिओत म्हटले होते की, “मला माहिती आहे की, जेव्हा मी या काळातून बाहेर येईल, तेव्हा किती लक्ष केंद्रित करू शकतो. मला माहिती आहे की, एकदा मोठी धावसंख्या केल्यानंतर मी प्रेरित होईल. एक शतकानंतर तो एकापाठोपाठ एक असेल. काही महिने विचलित न होता मी हे करू शकतो. मला माहिती आहे की, एकापाठोपाठ शतक झळकावण्यासाठी माझ्याकडे असे काहीतरी आहे, ज्याने मी प्रेरित होऊ शकतो. मला माहिती आहे की, मी अजूनही संघासाठी माझे योगदान देऊ शकतो आणि संघाला विजय मिळवून देऊ शकतो.”
https://twitter.com/katyxkohli17/status/1614584051540848640?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1614584051540848640%7Ctwgr%5Eb26d63f86531683296ee6d299f42b911426cedfc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-when-virat-kohli-was-struggling-for-century-he-said-a-big-thing-for-back-to-back-centuries-watch-video-5227857.html
मागील 6 आठवडे विराटने हातात घेतली नव्हती बॅट
शतकांचा वनवास संपवण्यापूर्वी विराट 6 आठवड्यांच्या दीर्घ सुट्टीवर होता. त्यावेळी त्याने बॅटला हातदेखील लावला नव्हता. मात्र, त्यानंतर त्याने हा वनवास संपवला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेबद्दल बोलायचं झालं, तर विराटने शतक झळकावल्यानंतर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तसेच, मैदानात षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने फक्त 110 धावांचा सामना करताना 8 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 166 धावा चोपल्या. अशात शतकांबाबत विराटचे वक्तव्य पूर्णपणे योग्य सिद्ध झाले आहे. (virat kohli was struggling for century he said a big thing for back to back centuries see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर फिल्डिंगला आला गिल; पठ्ठ्याला पाहून चाहतेही म्हणाले, ‘सारा…सारा’
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’