भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म यावर्षी चांगलाच चर्चेत आहे. कुठे काहीही घडो विराट आऊट ऑफ फॉर्म हा विषय क्रिकेटविश्वात ट्रेंड होत आहेच. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करून बराच कालावधी लोटला आहे. यामुळे त्याच्यावर चौफेर बाजूने टिका होत आहे. यामध्ये काही आजी माजी क्रिकेटपटूंनी तीव्र शब्दांत टीकाही केली आहे. तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. अशातच पाकिस्तानच्या दिग्गजाने त्याचा फॉर्म कसा परतणार यावर उपाय सांगितला आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने त्याच्या राष्ट्रीय संघाला आऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या खेळाडूंचा फॉर्म परत आणण्याचा इतिहास आहे. यावेळी त्याने विराटकडे निशाना करत म्हटले, “विराट एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करू शकतो.” मात्र असे पाकिस्तान विरुद्ध नको व्हायला याचीही त्याला आशा आहे.
यावर्षात विराट कोहली (Virat Kohli) धावा करण्याची धडपड करतोय. काही सामन्यांमध्ये त्याने वाईट खेळीही केली आहे. त्याने २०१९मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक केले. सद्यस्थितीत त्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना दानिश म्हणाला, “२८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार फॉर्ममध्ये परतण्यास मदत होणार आहे.”
दानिश म्हणाला, “तुम्ही जर पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर, असे खूप आउट ऑफ फॉर्म खेळाडू आमच्या विरुद्धच्या सामन्यात खेळताना फॉर्ममध्ये आले आाहेत. असे आमच्यासोबत होतच असते. खेळाडू कसाही खेळो तो पाकिस्तान विरुद्ध फॉर्ममध्येच येतो. विराटला माहित आहे त्याला त्या सामन्यात चांगली खेळी करायची आहे.”
विराटला वेस्ट इंडिज पाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही विश्रांती देण्यात आली. यामुळे तो थेट आता एशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आजच्या दिवशी (१८ ऑगस्ट) २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा कारकिर्दीला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान त्याने २३ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ७० शतके आणि १२२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची ही क्रिकेटची कामगिरी उल्लेखनीय ठरत असताना मागील काही मालिकांमध्ये तो विशेष खेळी करू शकला नाही. त्याने लवकरात लवकर चांगली मोठी आणि महत्वाची खेळी करावी याचीच चाहते वाट पाहत आहे.
टी२० विश्वचषकामुळे यंदाचा एशिया कप टी२० प्रकारात होत आहे. संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. तर विराटची पाकिस्तान विरुद्धची टी२० तील सरासरी पाहिली तर ती आता खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकाची आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध ७ सामन्यात ७७.७५च्या सरासरीने ३११ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शमी-बुमराहबाबत हे काय बोलून गेला रोहित?
अस्पायरची स्वप्नवत सुरवात! महिला फुटबॉल लीग पात्रता फेरीत लॉलेस युनायटेडवर सहज विजय
अल्टीमेट खो खो स्पर्धेत विजयी पुनरागमनासाठी मुंबई खिलाडीज सज्ज