विराट कोहली 12 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. तो 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यात खेळेल. एका मीडिया रिपोर्टनुसार, कोहलीने रणजी ट्रॉफीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. परंतु तो 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. मानेच्या दुखण्याचे कारण देत त्याने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. आता दिल्ली संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने रेल्वेविरुद्धच्या सामन्यावर मोठे विधान केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग म्हणाले, “विराट कोहलीने डीडीसीए अध्यक्ष रोहन जेटली आणि संघ व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे. त्यांना कळवले आहे की तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.” कोहलीने रणजी इतिहासात 2012 मध्ये शेवटचा सामना खेळला. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 14 धावा आणि 43 धावा केल्या. बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम बनवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सर्व खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळावे लागतील. स्थानिक क्रिकेट खेळणे आता अनिवार्य झाले आहे.
VIRAT KOHLI WILL BE PLAYING RANJI TROPHY AFTER 13 YEARS ON JANUARY 30th. [Sumit Ghosh from ABP] pic.twitter.com/MoghHyu9rC
— Johns. (@CricCrazyJohns) January 20, 2025
विराट कोहली व्यतिरिक्त, इतर अनेक खेळाडू 2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या पुढील टप्प्यात खेळताना दिसतील. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे पुढील सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसतील. जो जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळला जाईल. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल पंजाबकडून खेळताना दिसेल. रिषभ पंतनेही दिल्लीकडून पुढील सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे. जो सौराष्ट्रविरुद्ध खेळला जाईल. पंजाबविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलही कर्नाटककडून खेळणार होता. पण कोपराच्या दुखापतीमुळे तो परतू शकणार नाही.
हेही वाचा-
IND VS ENG; टी20 मालिकेपूर्वी संघाने घेतला मोठा निर्णय, हा खेळाडू यष्टीरक्षण करणार नाही
IPL 2025; 7 संघांच्या कर्णधाराची घोषणा! आरसीबी, केकेआरसह दिल्लीही कर्णधाराच्या शोधात
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल रिषभ पंतची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…