भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मागच्या काही महिन्यांपासून आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसते. शुक्रवारी (19 मे) विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपले सहावे आयपीएल शतक ठोकले. भारतीय संघाला येत्या जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने अनेक महत्वाच्या स्पर्धा आणि मालिका जिंकल्या आहेत. सध्या पाँटिंग आयपीएल 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. पाँटिंगच्या मार्गदर्शनातील दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. शनिवारी (20 मे) दिल्ली लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल.
या सामन्यापूर्वी शुक्रवारी (19 मे) पाँटिंगने दिल्लीत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या निशाण्यावर असे, असे सांगितले. पाँटिंग म्हणाला, “मला खात्री आहे की, ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांच्या नजरा त्याच्या विकेटवर असतील. अंतिम सामना भारताची वरची फळी आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये असेल. याठिकाणी जबरदस्त कसोटी क्रिकेट अनुभवता येऊ शकते.” रिकी पाँटिंगच्या मते भारतीय संघाला आपल्या दुखापदग्रस्त खेळाडूंची कमी जाणवेल.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा हा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियसाठी है मैदान अधिक जवळचे आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याठिकाणी खेळण्याचा मोठा अनुभव आहे. पाँटिंगच्या मते ऑस्ट्रेलियासाठी हे घरच्या मैदानासारखेच आहे. असात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातही संघातील गोलंदाजांना या गोष्टीचा फायदा मिळू शकतो. (Virat Kohli will be the target of Australian bowlers in the WTC final, says Ricky Ponting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरान मलिकला न खेळवल्याने भडकला भारतीय दिग्गज, सनरायझर्सच्या मॅनेजमेंटला घेतले फैलावर
‘सहा तास तिथं होतो, पण तो माझ्याशी बोललाही नाही…’, युवा फलंदाजावर सेहवाग नाराज