---Advertisement---

‘कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा…’ माजी कर्णधाराचा कांगारुंच्या संघाला इशारा

---Advertisement---

भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला वनडे, टी२० आणि कसोटी, असे तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिका खेळायच्या आहेत. परंतु या दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी ऑस्ट्रेलिया संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने विराट कोहली आणि भारतीय संघाविरुद्ध खेळताना स्लेजिंग करू नये. कारण असे केल्याने ते आणखी आक्रमक होऊन चांगली खेळी करतील, असे स्टीव्ह वॉ म्हणाले. कारण याअगोदर मागील वर्षी असेच घडले व भारताने टीम पेनच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते. त्यामुळे भारतासोबत केलेलं स्लेजिंग महागात पडू शकतं असे वॉ यांना वाटते.

स्टीव्ह वॉ म्हणाले की, “विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. या मालिकेत तो सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू इच्छितो. मागच्या वेळी भारतात स्टीव्ह स्मिथने तीन शतकं ठोकली होती. ही गोष्ट त्याच्या डोक्यात असणार व त्या पद्धतीनेच इथे खेळ करणार आणि तो जिंकण्यासाठी विशेष खेळ करण्याच्या विचारात असणार.”

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरुवातीला 3 वनडे सामने व 3 टी-20 सामने खेळणार आहे. व त्यानंतर ‘बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी’ला म्हणजेच कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 17 डिसेंबरपासून ऍडलेड ओव्हल येथे होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल. त्यानंतर 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर 7 जानेवारीपासून सिडनी व 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं

-भारतीय क्रिकेटरबरोबर पार्टी करताना दिसली आंद्रे रसेलची पत्नी, हुक्का घेत…

-Corona Effect: ख्रिस गेल, डू प्लेसिस यांचा सहभाग असलेली ‘ही’ मोठी स्पर्धा तिसऱ्यांदा स्थगित

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०मध्ये नाही चालली ‘या’ फलंदाजांची जादू, षटकार मारण्यातही ठरले अपयशी

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या भीडूंची प्लेइंग इलेव्हन, धोनीला कर्णधारपद तर यष्टीरक्षक…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---