दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका कर्णधार म्हणून विराट कोहली याची (Virat Kohli) शेवटची मालिका ठरली. आता यापुढे तो पुन्हा एकदा केवळ खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. येत्या १९ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपासून तो खेळाडू म्हणून दिसेल. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अनेकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाला १९८३ विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev Statement) यांनी विराट कोहलीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “तो सध्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी संघर्ष करतोय. परंतु, आता त्याच्यावर कुठलाही दबाव नसेल. तो मनमोकळे खेळू शकतो. कोहलीवर हल्लीच्या काळात खूप दबाव होता. परंतु, तो आता मोकळेपणाने फलंदाजी करू शकेल.”
“आता कोहली कर्णधार नाहीये, त्यामुळे त्याला आपला अहंकार सोडून संघासोबत वाटचाल करावी लागणार आहे. गावसकर माझ्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. त्याचबरोबर अझहर आणि के श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली मी खेळलो आहे, पण आमच्यामध्ये कोणताही अहंकार नव्हता.”
अधिक वाचा – कॅप्टन्स इनिंग! विराटने कसोटी कर्णधार असताना केलेल्या ‘या’ ५ खेळी विसरणे अशक्यच
तसेच ते पुढे म्हणाले की, “विराट कोहलीला आता सर्व काही विसरून पुढे जावं लागणार आहे. मुख्य बाब म्हणजे त्याला आपला अहंकार विसरून युवा खेळाडूंना पुढे घेऊन जावं लागणार आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावं लागणार आहे. आम्हाला कोहलीला एक फलंदाज म्हणून पुढे जाताना पाहायचं आहे, आहाला त्याला गमावायचे नाहीये.”
व्हिडिओ – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी|
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याने जेव्हा भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यावेळी भारतीय संघ ७ व्या स्थानी होता. आता हा संघ अव्वल स्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या :
बिग बॅशमध्ये इतिहास घडणार! ‘हा’ भारतीय करणार पदार्पण; फिंचने दिली संधी
नेतृत्व सोडल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक; सराव सत्राच्या शुभारंभाची क्षणचित्रे व्हायरल
हे नक्की पाहा: