भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती. आता यानंतर येत्या ९ एप्रिल पासून भारतात आयपीएल स्पर्धा सुरुवात होणार आहे. या स्पर्धेकरिता खेळाडूंनी आपआपल्या संघात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. परंतु, विराट कोहलीने वनडे मालिकेनंतर आपल्या कुटुंबासह ३ दिवसासाठी घराकडे प्रस्थान केले होते. तर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला केव्हा जोडला जाईल हा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
आयपीएल २०२१ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गतवर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर रजा घेत माघारी परतलेला विराट कोहली हा गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या सराव शिबिरासाठी जोडला जाणार आहे.
बायो बबलच्या बाहेर गेल्यामुळे त्याला काही दिवस विलग्नवासात राहावे लागू शकते. तसेच इतर खेळाडूंनी आयपीएलच्या दृष्टीने नऊ दिवसांच्या आरसीबीच्या सराव शिबिरात आपली उपस्थिती दर्शवली आहे. यात मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे.
तसेच संघातील उर्वरित खेळाडू ७ दिवसाचा विलग्नवसाचा काळ संपल्यानंतर सरावाला सुरुवात करणार आहेत. बेंगलोरचे ९ दिवसांचे सराव शिबिर चेन्नईमध्ये सुरू झाले आहे. या शिबिरात खेळाडूंना संजय बांगर, श्रीराम श्रीधरन, एडम ग्रिफिथ, शंकर बासु आणि मालोलान रंगराजन यांसारख्या अनुभवी प्रशिकांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. तसेच या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आपले पाहिले विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
आयपीएल २०२१ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप (यष्टीरक्षक), एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डेनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, एडम जॅम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जॅमीसन, डॅनियल क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई आणि केएस भारत.
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा नव्या नावासह उतरणाऱ्या पंजाबने आयपीएल २०२१ साठी लाँच केली नवी जर्सी, पाहा व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा चेंडू किती महाग असतो माहीत आहे का? घ्या जाणून
सचिन, गांगुली आणि द्रविडने २४ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन