---Advertisement---

विराट कोहली वनडे कारकीर्दीत करणार ६२ शतके! जाणून घ्या का?

On: शनिवार, फेब्रुवारी 17, 2018 6:57 PM
---Advertisement---

सेंच्युरीयन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १७०००धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे झाला. 

हे करताना त्याने एक खास विक्रम केला आहे. तो म्हणजे वनडेत ३५ शतक करण्याचा. विराटने २०८ वनडेत २०० डावात ३५वेळा नाबाद राहत त्याने ५८.१०च्या सरासरीने तब्बल ९५८८ धावा केल्या आहेत.

भारताकडून केवळ सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७०००  धावा केल्या आहेत. 

असे असताना एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि तो म्हणजे विराट वनडेत किती शतके करु शकतो? याचे उत्तर स्वतः विराटने जरी दिले नसले तरी विराटचा एकवेळचा संघसहकारी विरेंद्र सेहवागने याचे उत्तर दिले अाहे. 

एका चाहत्याने विरेंद्र सेहवागला ट्वीटरवर एक प्रश्न विचारला की विराट कारकिर्दीच्या शेवटी किती शतके करेल?

https://twitter.com/iamashutoshg/status/964577393087303682

यावर सेहवागने ६२ असे उत्तर दिले अाहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment