एकीकडे भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळण्यात व्यस्त असताना संघातील काही वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यावर विराट कोहली यालाही आराम देण्यात आला आहे. हे तिन्ही वरिष्ठ खेळाडू येत्या इंग्लंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करतील. तत्पूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट त्याच्या पत्नीसोबत म्हणजे अनुष्का शर्मा हिच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. नुकताच अनुष्काने स्वत: त्यांचा दोघांचा फोटो शेअर केला आहे.
अनुष्काने (Anushka Sharma) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्यूट अशी सेल्फी शेअर केली आहे, ज्यामध्ये ती विराटसोबत समुद्रकिनारी सुंदर (Virat-Anushka On Beach) अशा क्षणांचा आनंद लुटताना (Virat Kohli Enjoying Vacation) दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत अनुष्काने डीप नेक प्रिटेंड हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर विराट स्लिव्हलेस टी शर्टमध्ये दिसत आहे. या फोटोच्या बॅकग्राउंडला समुद्रकिनारा दिसत आहे. दोघेही या फोटो खूप कूल दिसत आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला खेळायचे आहेत ७ सामने
दरम्यान विराटला आयपीएल २०२२ च्या रणधुमाळीनंतर २० दिवसांसाठी विश्रांती दिली गेली आहे. तो १५-१६ जून रोजी भारतीय संघासोबत इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ त्यांचा राहिलेला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत हा खेळवला जाईल. गतवर्षी कोरोनामुळे भारत आणि इंग्लंडमधील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला होता. या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.
त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका होईल. ही मालिका ७ ते १० जुलैदरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर दोन्ही संघ १२ ते १७ जुलै, या कालावधीत ३ सामन्यांची वनडे मालिका खेळतील.
इंग्लंडविरुद्ध भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसीध कृष्णा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत बीसीसीआय ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?
‘त्या’ दिवशी सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा भारतीय संघाचा हिरो बनलेला, जाणून घ्या एका क्लिकवर
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला गेला वर्ल्डरेकॉर्ड; दोघांच्या ७ खेळाडूंनी केली ‘ही’ भन्नाट कामगिरी