भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आहे. पण तो त्याच्या शाळेमध्ये अधिराज्य गाजवू शकला नाही. कोहलीची इयत्ता दहावीची गुणपत्रिका व्हायरल झाली आहे. ते पाहून स्पष्ट समजतं की, दहावी-बारावीचा रिझल्ट आपलं आयुष्य घडवू शकत नाही. कोहलीनं इंग्लिश विषय सोडून बाकीच्या सर्व विषयांमध्ये बऱ्यापैकी गुण मिळवले आहेत.
अहवालानुसार विराट कोहलीनं (Virat Kohli) विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यानं सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूल, पश्चिम विहारमध्ये दहावीत शिक्षण घेतलं. तर इतिहास हा कोहलीचा आवडता विषय होता. कोहलीनं 2004मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला होता.
View this post on Instagram
2008मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याची प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर त्यानं त्यावर्षीच भारतासाठी पदार्पण केलं होतं. एक दिग्गज खेळाडू असण्यासोबतच कोहली त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याच्या कुटुंबासाठी खूप समर्पित आहे. 2017मध्ये त्यानं अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं होतं. आता त्याला दोन मुलं आहेत. त्याची मुलगी वामिकाचा जन्म 2021मध्ये झाला आणि मुलगा अकायचा जन्म फेब्रुवारी 2024मध्ये झाला होता.
कोहलीनं 113 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 8,848 धावा ठोकल्या आहेत. तर त्यासोबतच त्यानं 30 अर्धशतकांसह 29 शतकं झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. यादरम्यान कसोटीमध्ये त्याची फलंदाजी सरासरी 49.15 राहिली आहे.
292 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात कोहलीनं 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यानं एकदिवसीय सामन्यात 13,848 धावा ठोकल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे. जी त्यानं पाकिस्तानविरुद्ध केली होती. कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 72 अर्धशतक झळकावली आहेतच, सोबतच त्यानं 50 शतकही ठोकले आहेत. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
कोहलीच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 125 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 4,188 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीची टी20 क्रिकेटमधील फलंदाजी सरासरी 48.69 आहे. तर सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्यानं 38 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. परंतू भारतानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो फक्त एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने
‘जय शाह जे म्हणतील तेच सर्व…’ चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूनी दिली प्रतिक्रिया
एबीसी बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या हंगामाची अधिकृत घोषणा