अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. रविवारी (12 मार्च) विराट कोहली याने स्वतःचे 75वे आंतरराष्ट्रीय शतक केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना विराट कोहली आणि अक्षर पटेल खेळपट्टीवर कायम होते. चौथ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढला. विराटने आपल्या शतकाचे रुपांतर पुढे दीडशतकात केले. सोबतच संघाची धावसंख्या 500पर्यंत पोहोचवली.
विराट कोहली (Virat Kohli) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अपेक्षित खेली केली नव्हती. पण उभय संघांतील चौथ्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचा फायदा विराटने पुरेपूर घेतला. अहमदाबादमध्ये विराटने 241 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यात 5 चौकारांचा समावेश होता. शतकीय खेळीनंतर विराटने अधिकच आक्रमकतेने फलंदाजी सुरू केली. परिणामी 313 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने विराट 150 धावांपर्यंत पोहोचला. विराटने वैयक्तिक 150 धावा करताना संघाच्या 500 धावा देखील पूर्ण झाल्या. यात शुबमन गिल (Shubman Gill) यायच्या 128 धावांचे योगदान देखील महत्वाचे राहिले.
The Man. The Celebration.
Take a bow, @imVkohli 💯🫡#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/QrL8qbj6s9
— BCCI (@BCCI) March 12, 2023
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघालने सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांच्या शतकाच्या जोरावर 480 धावा केल्या. ख्वाजाने 180, तर ग्रीनने 114 धावांचे योगदान संघाची धावसंख्या उंचावली. तर दुसरीकडे भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या डावात सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने या विकेट्ससाठी 15 षटकांमध्ये 91 धावा खर्च केल्या. अश्विनपाठोपाठ पहिल्या डावात भारतासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
उभय संघांतील या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीसाटी अनुकूल असल्यामुळे गोलंदाज चांगलेच अडचणीत आल्याचे दिसले. सामन्याच्या चौथ्या दिवशी देकील पहिला डाव संपला नसल्याने निकार अनिर्णित राहणार, हे जवळपास पक्केच आहे. भारताला हा सामना जिंकता आला नाही, तर जागतिक कसोटी अजिंक्यदाच्या अंतिम सामन्याच्या त्यांचे स्वप्न श्रीलंकन संघाच्या हातात असेल. श्रीलंकन संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील एक सामना जर श्रीलंकेने गमावला किंवा अनिर्णित केला, तर भारत अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा पक्की करू शकतो.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन
अखेर विराटच्या कसोटी शतकांचा दुष्काळ संपला, सेंच्युरीसाठी घेतले वनडे अन् टी20पेक्षाही जास्त दिवस, वाचाच