जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक खेळाडू विराट कोहली याचीही गणना झाल्याशिवाय राहत नाही. मागील काही वर्षांपूर्वी विराट खूपच खराब फॉर्ममध्ये होता. त्याला अर्धशतक करतानाही संघर्ष करावा लागायचा. मात्र, मागील वर्षीच्या अखेरपासून विराटची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. विराट नुसता शतकांचा पाऊस पाडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, खराब फॉर्ममधून गेल्यानंतर विराटने वनडे, टी20 आणि कसोटीत शतक करण्यासाठी बराच वेळ घेतला. त्याचाच आढावा घेणारा हा लेख.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले खणखणीत शतक
विराट कोहली (Virat Kohli) याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक साजरे केले. त्याने यावेळी 241 चेंडूंचा सामना करत 100 धावा चोपत शतक केले. विराटने हे शतक करताना फक्त 5 चौकार मारले. हे विराटचे 28वे कसोटी शतक होते. विशेष म्हणजे, विराटने तब्बल 1205 दिवसांनंतर कसोटी शतक केले आहे. म्हणजेच त्याने तब्बल 3 वर्षे, 3 महिने आणि 20 दिवसांनंतर कसोटीतील शतकाचा दुष्काळ संपवला आहे.
Relief for Virat Kohli after a wait of 1205 days.
More 👇#WTC23 | #INDvAUShttps://t.co/J2LiusZq50
— ICC (@ICC) March 12, 2023
वनडे शतकासाठी पाहिली 1116 दिवसांची वाट
यापूर्वी विराट कोहली हा वनडे शतक करण्यासाठीही संघर्ष करत होता. मात्र, त्याने 10 डिसेंबर, 2022 रोजी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत चट्टोग्राम येथे शानदार शतक झळकावले होते. त्याने 91 चेंडूंचा सामना करत 113 धावा केल्या होत्या. हे शतक तब्बल 1116 दिवसांनी आले होते. त्याआधी विराटने 14 ऑगस्ट, 2019 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे नाबाद 114 धावांची खेळी करत शतक केले होते.
The Man. The Celebration.
Take a bow, @imVkohli 💯🫡#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/QrL8qbj6s9
— BCCI (@BCCI) March 12, 2023
टी20 शतक ठोकण्यासाठी घेतले 1021 दिवस
विराटने शतकांचा दुष्काळ सर्वप्रथम टी20 क्रिकेटमध्ये संपवला. त्याने आशिया चषकमध्ये खेळताना 8 सप्टेंबर, 2022 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दुबई येथे शतक केले होते. यावेळी विराटने 61 चेंडूत 122 धावांची खेळी केली होती. यामध्ये 6 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. विराटचे हे शतक 1021 दिवसांनंतर आले होते. हे त्याचे पहिलेच टी20 शतक होते. (virat kohli takes days to hit century in all format read here)
Virat Kohli scores a Test hundred for the first time in over three years 🎉#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/V3TIf48iVc
— ICC (@ICC) March 12, 2023
विराटला शतकांचा दुष्काळ संपवण्यास लागलेला वेळ
पहिले आंतरराष्ट्रीय टी20 शतक
1021 दिवसांनंतर
पहिले वनडे शतक
1116 दिवसांनंतर
पहिले कसोटी शतक
1205 दिवसांनंतर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किंग कोहलीची गर्जना! विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक, 3 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच
चाहत्यांनी पंतच्या नावाचा गजर करत लायनला दाखवली भीती, मैदानात नारे लागताच स्पिनरची पडली मान आणि…