विराट कोहलीसाठी २०२१ हे वर्ष चांगले नव्हते. त्याला खराब कामगिरीमुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडावे लागले. तो आता आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार सुद्धा नाही. त्याच्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषकात सुद्धा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विश्वचषकात भारताविरुद्ध सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पाकिस्तान संघाकडूनच भारताला १० विकेट्सने पराभूत व्हावे लागले. अशातच विराटबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आहे. २०२०मध्ये त्याची कमाई १८०० कोटी रुपये होती. मात्र, २०२१मध्ये कोहलीची कमाई ४०० कोटी रुपयांनी कमी होऊन १४०० कोटी रुपयांवर आली आहे. विराट कोहलीच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम झाला आहे. असे असले, तरीही सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी २०२१मध्ये कमाईच्या बाबतीत तो अजूनही अव्वल स्थानावर आहे.
धोनीच्या कमाईत वाढ
टॉप १० मध्ये त्याच्याशिवाय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) देखील आहे. धोनीही यावेळी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळत आहे. त्याने सीएसकेचे कर्णधारपद सोडले असून आता संघाचे नेतृत्व रवींद्र जडेजा करत आहे. एमएस धोनीच्या कमाईत वाढ झाली आहे. त्याची कमाई ४६४ कोटींच्या आसपास पोहोचली आहे. तो टॉप ५मध्ये पोहोचला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची कमाई कमी झालेली नाही. त्याच्या खेळाबद्दल बोलायचं झालं, तर आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. तो भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत २०व्या क्रमांकावर आहे. या दरम्यान तिची कमाई जवळपास १६६ कोटी रुपये झाली आहे. नुकतीच तिने स्विस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. तिच्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
विराट कोहली आणि एमएस धोनी यांनी सध्याच्या आयपीएलच्या आपापल्या पहिल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही खेळाडूंच्या संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. २०२२ टी२० विश्वचषकही या वर्षी ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटरने सांगितली पाकिस्तानच्या आझमची आयपीएलमधील किंमत; म्हणाला, ‘तो १५-२० कोटींना…’
आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल