भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणी माजी कर्णधार विराट कोहली सध्या संघातून बाहेर आहे. विराटने वैयक्तिक कारण सांगत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण याविषयी देखील अद्याप खात्री दिली गेली नाहीये. अशातच विराट कोहलीच्या आईची तब्येत ठीक नाही, अशा बातम्या समोर आल्या. आता या बातम्या चुकीच्या ठरत आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील ही मालिका भारतात खेळली जात असून पाहुण्या इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताला 28 धावांनी पराभूत केले. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (28 जानेवारी) विशाखपट्टणममध्ये सुरू होणार आहे. वैयक्तिक कारणास्तव या पहिल्या दोन्ही सामन्यांमधून विराट कोहली () बाहेर पडला होता. विराटने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण काही दिवसांपासून अशा बातम्या समोर येत आहेत की, विराटच्या आईची तब्येत बिघडली आहे. याच कारणास्तव विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. पण आता विराटचा मोठा भाऊ विकास कोहलीने याविषयी महत्वाची माहिती सर्वांना दिली.
विकास कोहलीने सांगितल्याप्रमाणे त्याची आई ठीक असून तिच्या तब्येतीत कुठलीच घसरण आली नाहीये. माध्यमांमधील बातम्या आणि चर्चा चुकीच्या आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याने पोस्ट केली आहे की, “मी पाहतोय, आमच्या आईच्या तब्येतीविषयी खोट्या बातम्या येत आहेत. मी हे स्पष्ट करतोय की, आमची आई पूर्णपणे फिट आणि ठीक आहे. तसेच मी सर्वांना विनंती करेल की, पक्की माहिती असल्याशिबाय अशी माहिती पुढे शेअर करू नका. माध्यमांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. काळजी व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार.”
दरम्यान, वडली 2006 मध्ये निधन पावल्यानंतर विकास यानेच विराटला क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी पाठिंवा दिला. 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच विकास एकप्रकारे विराटच्या मॅनेजरची भूमिका पार पाडत आला आहे. विराटच्या कोट्यावधी रुपयांचे व्यावसाय देखील विकास सांभाळतो. One8 या नावाने त्याचे देशभरतात रेस्टॉरंट्स देखील आहेत. विराट आणि विकास यांना एक बहीण देखील आहे, जिचे नाव भावना आहे. (Virat Kohli’s brother Vikas informed that the mother is completely fit and fine)
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! मयंक अगरवालवर विषप्रयोग? स्टार फलंदाजाकडून पोलीसात तक्रार दाखल
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । महाराष्ट्राची २० पदकांसह जोरदार मुसंडी