भारतीय संघ सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे. गेल्या काही काळातील भारतीय संघाचे प्रदर्शन देखील उल्लेखनीय राहिले आहे. असे असले तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या अनेक काळापासून चाहते कोहलीच्या चांगल्या खेळीच्या प्रतीक्षेत आहे.
कोहलीकडून २०१९ पासून अजून एकही शतक आलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गुणतालिकेत कोहलीचे अव्वल स्थान देखील घसरले आहे. कोहली सध्या कसोटी क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर आहे.
यादरम्यान, कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कोहलीच्या क्रमवारीतील या फेर-बदलामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना शर्मा म्हणाले, “ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. विराट कोहलीची क्रमवारीत ५ व्या स्थानावर घसरण झाली आहे. मला वाटत होते की, जो रूट कोहलीच्या पुढे जाऊ शकणार नाही. याबाबत मी नक्कीच कोहली सोबत चर्चा करेन.”
कोहलीने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आत्तापर्यंत खेळलेल्या ३ डावांमध्ये ०, ४२ आणि २० एवढ्याच धावा केल्या आहेत. मात्र, ही मालिका जसजशी पुढे जाईल तसतसे कोहलीची कामगिरी सुधारावी अशी तमाम भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. वैयक्तिक कामगिरी चांगली झाली नसली तरी इंग्लंड विरुद्ध झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात कोहलीने भारतीय संघाचे उत्कृष्टरित्या नेतृत्व केले आहे.
त्याचबरोबर कोहलीच्या लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या मते, कोहली सध्या अत्यंत चांगल्या मनस्थितीत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी चिंता करण्यासारखी कोणतीही बाब नाही. नुकतेच त्यांनी कोहली सोबत चर्चा केली होती. यावरून त्यांची आशा आहे की विराट कोहलीकडून लवकरच शतक येऊ शकते.
इंडिया न्यूज सोबत बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले, “मला नाही वाटत की त्याला सध्या प्रेरित करण्याची गरज आहे. कारण तो आधीपासूनच खूप प्रेरित आहे. जेव्हा मी त्याच्या सोबत मागच्या कसोटी सामन्यानंतर चर्चा केली होती. तेव्हा तो अत्यंत उत्साहात होता आणि भारतीय संघाच्या विजयामुळे खूष देखील होता. त्यामुळे तो त्याच्या खराब फॉर्मला घेऊन जास्त काळजीत नव्हता. जर त्याची मानसिकता अशी असेल तर आपण समजून घेतले पाहिजे की, लवकरच तो शतक ठोकून शकतो.”
कोहलीच्या मागील ४९ आंतरराष्ट्रीय डावांमधून एकही शतक आलेले नाही. हे कोहलीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ३ शतकांमधील सर्वात मोठे अंतर आहे. याच्या आधी २०१४ मध्ये कोहलीच्या २५ डावांनातर शतक आले होते. तर २०११ मध्ये त्याला शतकासाठी २४ डाव खेळावे लागले होते.
सध्या कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल १० फलंदाज
१) केन विल्यमसन ९०१
२) जो रूट ८९३
३) स्टीव्ह स्मिथ ८९१
४) मार्नस लबुशेन ८७८
५) विराट कोहली ७७६
६) रोहित शर्मा ७७३
७) रिषभ पंत ७३६
८) बाबर आजम ७२५
९) डेव्हिड वॉर्नर ७२४
१०) क्विंटन डी कॉक ७१७
महत्त्वाच्या बातम्या –
–“त्यांना देखील क्रिकेटपटूंसारखाच सन्मान द्या” सचिन तेंडुलकरच्या वक्तव्याने जिंकले कोट्यवधी भारतीयांचे मन
–“विराटसेना जुन्या भारतीय संघासारखी नाही, ज्यांना कोणीही डिवचू शकत होते”
–दहा वर्षानंतर पुनरागमन अन् १० सामन्यातच दाखवला जलवा, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम