पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी स्वस्तात विकेट गमावली. पण कर्णधार रोहित शर्माने संघाला वेगवान सुरुवात देण्यासाठी अप्रतिम फलंदाजी केली. विराट आणि गिल प्रत्येकी 16-16 धावा करून बाद झाले. मात्र, यादरम्यान विरटने मारलेल्या शॉट्समधून त्याची गुणवत्ता पाहायला मिळाली.
भारतीय संघाला या सामन्यात 192 धावांचे लक्ष्य मिळाले. पावरप्लेच्या 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या 2 विकेट्सच्या नुकसानावर 80 धावा होती. विरान कोहली (Virat Kohli) या सामन्यात 11 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 16 धावा करू शकला. यादरम्यान त्याने डावातील पाचव्या षटकात शाहीन शाह आफ्रिदी याला एक अप्रतिम चौकार मारला. विराटच्या या कव्हर ड्राईव्हचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला असून चाहत्यांकडून यावर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CyYUDHosyGg/?utm_source=ig_web_copy_link
(Virat Kohli’s cover drive to Shaheen Afridi went viral on social media)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
सुख! स्वस्तात बाद झालेल्या विराटचा कव्हर ड्राईव्ह एकदा पाहाच, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘हा’ विक्रम फक्त भारतानेच करावा! विश्वचषकात केवळ तिसऱ्यांदा पाहायला मिळाले गोलंदाजांचे खास प्रदर्शन