दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात रविवार रोजी (२४ जानेवारी) केपटाऊन येथे वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Third ODI) पार पडला. चिवट झुंजीनंतरही पाहुण्या भारताला अखेर ४ धावांनी हा सामना गमवावा लागला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेने ३-० च्या फरकाने भारताला क्लिन स्वीप केले आहे. एकीकडे भारताने या सामन्यासह मालिका गमावली. दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने अर्धशतक ठोकल्यानंतर खास सेलिब्रेशन (Virat Kohli’s Fifty Celebration) करत सामन्याला खास बनवले. त्याच्या या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या सामन्यात ८४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या आणि केशव महाराजच्या गोलंदाजीवर टेम्बा बावुमाच्या हाती झेल देत तो बाद झाला. यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika Kohli) कडे पाहून जल्लोष साजरा करताना दिसला.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच
त्याने सुरुवातीला अनुष्काला इशाऱ्यांमध्ये वामिका कुठे आहे?, असे विचारले. त्यानतर वामिका दिसताच त्याने हातात बॅट घेऊन, बाळाला खेळवल्याप्रमाणे हात हालवत वामिकाला हे अर्धशतक समर्पित (Virat Celebration For Vamika) केले. अनुष्कानेही टाळ्या वाजवत विराटच्या अर्धशतकी खेळीचे कौतुक केले. सोबतच ती वामिकाला हात करून वडिल विराट मैदानावर असल्याचेही दाखवताना दिसली. कोहली कुटुंबियांच्या मैदानावरील या क्षणांनी सामना दर्शकांचे मात्र लक्ष वेधले आहे. त्यांच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Rebelstaaar/status/1485286478871547906?s=20
https://twitter.com/Sam_78691/status/1485313559089139713?s=20
https://twitter.com/AzadKhayali/status/1485358527493607424?s=20
https://twitter.com/fanatic_devil16/status/1485266126670286848?s=20
पहिल्यांदाच चाहत्यांना पाहायला मिळाली वामिकाची झलक
विशेष म्हणजे, वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच अनुष्काने वामिकाचा चेहरा जगासमोर आणला आहे. यापूर्वी अनुष्का आणि विराट वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात अनुष्का वामिकाला घेऊन स्टँड्समध्ये सामना पाहताना दिसली. त्यामुळे पहिल्यांदाच चाहत्यांना वामिका चेहरा पूर्णपणे दिसू शकला आहे. यानंतर अनेकांनी वामिका ही वडिल विराटवर गेली असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून जेमिमा आणि शिखा विश्वचषक संघात नाहीत”; प्रशिक्षकांनी दिले स्पष्टीकरण
शास्त्री गुरूजी म्हणतायेत,”विराट आणखी दोन वर्षा नेतृत्व करू शकला असता”
लाजवाब शतकासह डी कॉकची भरारी! आता खुणावतोय संगकाराचा ‘तो’ विश्वविक्रम
हेही पाहा-






