---Advertisement---

विराटच्या मोठ्या बहिणीने त्याचा व्यवसाय नेला उंचावर, मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर; जाणून घ्या भावना कोहलीबद्दल

On: गुरूवार, ऑगस्ट 11, 2022 10:30 AM
Virat Kohli with Sister and Brother
---Advertisement---

भाऊ -बहिणींचा सण म्हणजेच रक्षाबंधन आज (११ ऑगस्ट) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने भरलेला मजबूत धागा बांधते. हा राखीचा धागा भावा-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानलं जातं. राखी बांधताना प्रत्येक वेळी दोघेही एकमेकांच्या सोबत असण्याचे वचन देतात. क्रीडा विश्वात भाऊ-बहिणीच्या जोडीच्या अशा अनेक कथा आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्याची मोठी बहीण भावना कोहली या दोन भावंडांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भावना कोहलीला लाइमलाइट अजिबात आवडत नाही. तिला फक्त तिच्या कुटुंबसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

भावनाला कॅमेऱ्यापासून दूर राहणे आवडते. याचे उदाहरण चाहत्यांनी फक्त कॅप्टन कोहलीच्या लग्नात पाहिले. लग्नामध्ये त्याची मोठी बहीण नेहमी कोहलीसोबत सावलीसारखी उपस्थित होती. मात्र, ती खूप कमी वेळेस कॅमेरासमोर आली होती.

भावनाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या धाकट्या भावाचा म्हणजेच विराटचा व्यवसाय उंचावर नेवून ठेवला आहे. भावना हा कोहलीच्या फॅशन लेबलचा महत्त्वाचा भाग आहे. कोहली क्रिकेटमध्ये प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्या बहिणीने त्याच्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे.

भावनाला महक आणि आयुष ही दोन मुले आहेत. भावनाने संजय ढिंगरासोबत लग्न केले होते. विराट आणि अनुष्काची मुलगी वामिकाबद्दल भावना म्हणाली होती की, ती एका परीसारखी दिसते.

महत्त्वाच्या बातम्या – 

रक्षाबंधन विशेष: पाच भारतीय दिग्गज क्रिकेटपटू आणि त्यांचे फारसे माहित नसलेले भाऊ-बहिण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---