---Advertisement---

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ

On: बुधवार, जून 5, 2019 3:07 PM
---Advertisement---

साउथॅम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात आज(5जून) आठवा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणार आहे. पण या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे या विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी या सामन्याच्या पुर्वसंधेला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्टेन बरा व्हावा, अशी आशा व्यक्त केली आहे. विराट आणि स्टेन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

स्टेनच्या दुखापतीबद्दल विराट म्हणाला, ‘मला वाईट वाटत आहे कारण तो आनंदी असल्याचे वाटत होते आणि तो चांगली गोलंदाजीही करत होता. पण अचानक कळाले की तो पुढे खेळू शकत नाही. त्यामुळे मला त्याच्याबद्दल वाईट वाटले. अनेक वर्षांपासून तो माझा मित्र आहे. तो एक प्रेरणादायी व्यक्ती आहे.’

‘तो दक्षिण आफ्रिकेकडून पुन्हा खेळण्यास आणि पुनरागमन करण्यासाठी आनंदी होता. तो चांगला खेळत होता आणि त्याच्यामध्ये अजूनही चांगल्या कामगिरीची भूक आणि जिद्द आहे. पण त्याच्या दुखापती त्याची साथ सोडण्यास तयार नाहीत. मी त्याची निराशा समजू शकतो.’

विराटने स्टेनच्या दुखापतीत सुधारणा व्हावी अशी आशा व्यक्त करताना म्हटले आहे की ‘मी अशा करतो की तो लवकर बरा व्हावा. मी त्याला पाहिले तेव्हा तो चांगल्या मानसिकतेत असल्याचे मला वाटले. तो खूप आनंदी होता. तो सर्वांबरोबर त्याच्या क्रिकेटची मजा घेत होता आणि गोलंदाजीही चांगली करत होता. त्यामुळे मी समजू शकतो की त्याला अस्वस्थ वाटत असेल.’

स्टेन खांद्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने या विश्वचषकातून एकही सामना न खेळता बाहेर पडला आहे. त्याला यावर्षीच्या आयपीएल दरम्यान खांद्याच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो आयपीएलमधून केवळ दोन सामने खेळल्यानंतर मायदेशी परतला होता.

तो विश्वचषकापर्यंत या दुखापतीतून बरा होईल अशी दक्षिण आफ्रिकेला आशा होती. त्यामुळे त्याला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात कायम करण्यात आले होते. परंतू त्याला खांद्याच्या दुखापतीचा त्रास अजूनही होत असल्याने अखेर स्टेनला या विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा ११ जणांचा संघ

जेव्हा जेव्हा भारत विश्वचषकातील पहिला सामना जिंकतो…

विश्वचषक २०१९: …तर आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होऊ शकतो रद्द

ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?

रोहित शर्माला आज विश्वचषकात हिट विक्रम करण्याची संधी, सौरव दादालाही टाकू शकतो मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment