भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याचा हा खराब फॉर्म घरच्या मैदानांवरही त्याची पाठ सोडताना दिसत नाहीय. भारतातील मुंबई, पुण्याच्या स्टेडियमवर सध्या आयपीएल २०२२चे साखळी फेरी सामने खेळवले जात आहेत. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्त्व करताना विराट सपशेल फ्लॉप ठरत आहे. त्यातही मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराटने पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता आपली विकेट गमावली. मात्र त्यानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया अधिक चर्चेत आहे.
आयपीएल २०२२मधील (IPL 2022) या ३१व्या सामन्यात लखनऊने (LSG vs RCB) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी बेंगलोरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. सलामीवीर अनुज रावतने ४ धावांवर विकेट गमावल्यामुळे विराट (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. परंतु लखनऊचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने (Dushmantha Chameera)
पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाच्या हातून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता विराट तंबूत परतला.
https://twitter.com/AkshatOM10/status/1516420847879299084?s=20&t=NQg-jeYZd9LURZ_6bJQHJg
Virat Kohli's reaction when he got out for golden duck. pic.twitter.com/4RFUpLH1MV
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 19, 2022
आयपीएलमध्ये चांगली खेळी खेळण्यासाठी झगडत असलेला विराट गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर बाद) (Virat Kohli Golden Duck) झाल्याचे पाहून स्वतशीच निराश झाला. अरे, हे काय केलेस, अशाप्रकारचे हावभाव त्याने गोलंदाजाला (Virat Kohli Reaction) दिले. त्याच्या या प्रतिक्रियेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Expression from Virat Kohli says it all – nothing going right for him. pic.twitter.com/5DHhI6gYXY
— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2022
How many trophies RCB won
Virat Kohli 👇👇👇 pic.twitter.com/DAY1BvAZLm
— ` (@WorshipDhoni) April 19, 2022
चार वर्षांनंतर झाला गोल्डन डक
दरम्यान विराटने आयपीएलमध्ये गोल्डन डक होण्याची ही चौथी वेळ होती. तब्बल ४ वर्षांनंतर त्याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली आहे. यापूर्वी तो २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गोल्डन डक झाला होता. तत्पूर्वी २०१४ मध्ये पंजाब किंग्ज आणि २००८ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ही नकोशी कामगिरी केली होती.
विराटच्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आतापर्यंतच्या प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने ७ सामने खेळताना १९.८३ च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ४८ धावा इतकी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध क्रिकेटपटूचे कॅन्सरमुळे निधन, ४०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
LSGvsRCB | गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी लखनऊ आणि बेंगलोरमध्ये झुंज, पाहा प्लेइंग इलेव्हन