---Advertisement---

लाईव्ह सामन्यात घुसला विराटचा चाहता, घेतला रोहित शर्माचा आशिर्वाद, पाहा VIDEO

On: गुरूवार, जानेवारी 25, 2024 4:57 PM
Virat Kohli's fan grabs Rohit Sharma's feet
---Advertisement---

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरशः काहीही करू शकतात. गुरुवारी (25 जानेवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान या गोष्टीची पुन्हा एकदा प्रत्यय आला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना असून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लाईव्ह सामन्यात रोहितचा एक चाहता थेट खेळपट्टीपर्यंत पोहोचल्याचा प्रकार गुरुवारी याठिकाणी पाहायला मिळाला. चाहतेने मैदानात आल्यानतंर जे केले, त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला या सामन्यात नाणेफेक जिंकता आली नाही. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघ आपल्या पहिल्या डावात 246 धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने 88 चेंडूत 70 धावांची सर्वोत्तम खेळी केली. दुसरा एकही फलंदाज या डावात इंग्लंडसाठी अर्धशतकी खेळी करू शकला नाही. भारतासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यायने 2, तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.

भारतीय संघासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी डावाची सुरुवात केली. कर्णधार रोहित खेळपट्टीवर आल्यानंतर काहीच वेळात स्टॅन्डमधून एका चाहत्याने थेट खेळपट्टीकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांचा घेरा मोडून तो मैदानात आल्यानंतर खेळपट्टीवर उभ्या असलेल्या रोहितचे पाय देखील धरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष लाईव्ह सामन्यात घुसलेल्या या चाहत्याने विराट कोहली याची जर्सी घातली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ही पहिलीच वेळ नाहीये, जेव्हा चाहत्यांनी अशा प्रकारे मैदानात धाव घेत आपल्या आवडत्या खेलाडूला मिठी किंवा मारली किंवा वाय धरले आहेत. याआधीही एमएस धोनी, विराट कोहली आणि इतर काही खेळाडूंसोबत असे झाले आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अशा गोष्टी सातत्याने होत असल्याचे पाहायला मिळते. (Virat Kohli’s fan touched the feet of Rohit Sharma in live Test Match between India and England )

महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG: संघात रोहित-बुमराह असतानाही स्टेडियमवर फक्त कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडीओ
IND vs ENG: आता जडेजाला ‘सर’ म्हणायला हरकत नाही, केलाय न मोडता येणारा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---