Virat Kohli On Cheteshwar Pujara Retirement: चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया दोन दिवसांनी समोर आली आहे. कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत पुजाराला त्याच्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Virat Kohli Instagram story) यासोबतच, नंबर चारवर आपली भूमिका सोपी केल्याबद्दल त्याने पुजाराचे आभारही मानले आहेत. उल्लेखनीय आहे की, (24 ऑगस्ट) रोजी पुजाराने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पुजारा बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. (Cheteshwar Pujara retirement)
विराटने आपल्या इंस्टा स्टोरिमध्ये लिहलं की, “पुज्जी, माझे काम सोपे केल्याबद्दल तुझे आभार. तुझी कारकीर्द अविश्वसनीय होती. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. देव तुझे भले करो.”
Virat Kohli's Instagram story for Cheteshwar Pujara ❤️🇮🇳 pic.twitter.com/u0JUj9DCP5
— Johns. (@CricCrazyJohns) August 26, 2025
चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 103 कसोटी आणि 5 वनडे सामने खेळले. पुजाराने 103 कसोटी सामन्यांच्या 176 डावात 43.60च्या सरासरीने फलंदाजी करताना 7,195 धावा केल्या. दरम्यान त्याने 35 अर्धशतकांसह 19 शतके झळकावली. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 राहिली. पुजाराने 5 वनडे सामन्यांमध्ये 51 धावा केल्या आहेत. (Cheteshwar Pujara’s international cricket career)






