भारतीय संघांचा कर्णधार विराट कोहली हा मैदानात नेहमीच चर्चेत असतो. त्याने फलंदाजीमध्ये आणि संघांचे नेतृत्व करताना अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. तसेच मैदानाबाहेर देखील तो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विराटला कारची देखील खूप आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक आहेत. ज्यामध्ये ऑडी, बीएमडब्लु पासून अनेक प्रसिद्ध कारचा समावेश आहे.यापैकीच एक कार आता विक्रीसाठी तयार आहे.
कारची प्रचंड आवड असलेल्या विराटकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.ज्यामध्ये ऑडी, बीएमडब्लु आणि अशाच काही महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या महागड्या कार पैकी एक कार म्हणजे, लॅम्बोर्गिनी गैलार्डो स्पाइडर. नारंगी रंगाची ही कार पाहताच कोणीही या कारच्या प्रेमात पडेल. विराट कोहलीने ही कार २०१५ मध्ये खरेदी केली होती. या कारची किंमत सध्या १.३५ कोटी रुपये आहे.
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार अवघ्या ४ सेकंदात ० ते १०० किलोमीटर स्पीड पर्यंत जाऊ शकते. तसेच या कारची टॉप स्पीड ३२४ किमी प्रती तास इतकी आहे. या कारमध्ये ५.२ लिटरचे वी १० इंजिन फिट करण्यात आले आहे.ही गाडी २०१५ मध्ये लाँच करण्यात आले आहे.
विराटने काहीकाळ या कारचा वापर केल्यानंतर ही कार विकून टाकली होती. कोची येथील रॉयल ड्राइव्ह या कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरने पुष्टी केली की, विराटची लॅम्बोर्गिनी विक्रीसाठी तयार आहे. ही कार फक्त १० हजार किलोमीटर चालली आहे.
तसेच कोचीच्या मार्केटिंग मॅनेजरने पुढे म्हटले की, ” ही कार रॉयल ड्राईव्हने याच वर्षी जानेवारी महिन्यात कोलकाताच्या एका कार डीलर कडून खरेदी केली होती. ही २०१३ ची लॅम्बोर्गिनी आहे. विराटने या कारचा वापर खूप कमी काळ केला आहे. ही कार फक्त १० हजार किलोमीटर चालली आहे. आम्ही ही सेलिब्रिटी कार जानेवारी २०२१ मध्ये कोलकात्यातील प्रीमियम आणि लक्झरी प्री-ओन्ड कार डीलरकडून खरेदी केली होती.”
महत्त्वाच्या बातम्या –
विराटची बात काही औरच!! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू
कोहली अन् केकेआर @२००! बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना सुरु होताच झाले २ मोठे विक्रम
टीम इंडिया २०२१-२२ मध्ये मायदेशात खेळणार तब्बल १४ टी२०, ४ कसोटी अन् ३ वनडे, पाहा संपूर्ण वेळापत्रक