बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅट ड्रॉप सेलिब्रेशन प्रकरण चांगलेच चर्चेले गेले आहे.
या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला केलेले धावबाद हा टर्निंग पाईंट ठरला होता. यावेळी सेलिब्रेशन करताना कोहलीने प्रथम फ्लाइंग किस दिला आणि लगेच बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले. यावेळी तो माईक ड्राॅप असे म्हणताना कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसले होते.
याचे कारण म्हणजे लीड्स वनडेत भारताविरुद्ध शतक साजरे केल्यावर जो रुटने बॅट ड्रॉप सेलिब्रेशन केले होते. त्याने हातातील बॅट हवेत आडवी उंच नेऊन खाली सोडून दिली होती.
विशेष म्हणजे त्याने ही कृती कर्णधार विराट कोहलीसमोर केली होती. याची मोठी चर्चा सोशल मीडियावर तेव्हा झाली होती. ही वनडे मालिका इंग्लंड 2-1ने जिंकला होता.
त्यामुळे पुन्हा एकदा विराटने रुटला या कसोटीत बाद केल्यानंतर केलेले हे सेलिब्रेशन पुन्हा चर्चेत आले. त्यामुळे यावर रुटने आपली मते मांडली आहेत.
रुट स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, मी मैदानावर असताना त्याचे सेलिब्रेशन पाहिले नाही. पण मी नक्किच ते बुधवारी रात्री पाहिले.”
“ते पाहुन मी विचार केला की यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना मजा येईल. तसेच मालिका यामुळे जास्त रंजक होइल. अशा गोष्टी मालिकेच्या सुरुवातीलाच झाल्या आहेत. त्यामुळे आता पाहू की या मालिकेत पुढच्या गोष्टी कशा घडतात.”
@abhi_nufc @imVkohli @DjokerNole watch this https://t.co/hS58olqy6x
— Aaron Kumar (@Aaronk28) August 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं
–उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!
–पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात