---Advertisement---

गंभीरच्या खुन्नसला विराटचे प्रेमाने उत्तर! एकाच कृतीने जिंकले लखनऊच्या चाहत्यांचे मन, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, मे 1, 2023 11:24 PM
Virat Kohli vs Gautam Gambhir
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात दोन्ही संघांचे फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले. पण तरीदेखील सामन्यातील रोमांच कायम होता. विराट कोहली याने लाईव्ह सामन्यात दिलेली एक रिएक्शन सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील विराटने गौतम गंभीरवर थेट निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी भारतीय संघासाठी अनेक सामने एकत्र खेळले आहेत. पण दोघांमधील वाद देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. विराट कोहली आणि गंभीर यांच्यात आयपीएल 2013मध्ये लाईव्ह सामन्यादरम्यान जोरदर भांडण झाले होते. या वादाला आज 10 वर्ष झाले आहेत आणि विराट आणि गंभीरमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे मागच्या बऱ्याच काळापासून पाहायला मिळाले आहे. असे असले तरी, समोवारी विराटने मैदानात दिलेली एक रिएक्शन पाहून चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

इकाना स्टेडियमवर खेळताना आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात अवघ्या 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या गोलंदाजांनाही झटपट विकेट्स मिळू लागल्या. लखनऊच्या डावातील चौथ्या षटकात कृणाल पंड्याच्या रूपात आरसीबीला दुसरे यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेलच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने कृणालचा झेल पकडला. हा झेल घेतल्यानंतर विराट चांगलाच उत्साहात होता. कृणाल तंबूत परतत असताना विराटने प्रेक्षकांकडे पाहून फ्लाइंग किस दिले. सोबत त्याने तोंडावर बोट ठेवणे योग्य नाही असा इशाराही केला. विराटची ही रिएक्शन लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीरसाठी असल्याचे चाहत्यांकडून बोलले जात आहे.

आयपीएल 2023 मध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा आरसीबी आणि लखनऊ संघ आमने सामने आहेत. याआधी हंगामातील 15वा सामना 10 एप्रिल रोजी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि लखनऊमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात आरसीबीला शेवटच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला होता. विजयानंतर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर स्टॅन्डमध्ये बसलेल्या चाहत्यांकडे पाहून तोंडावर बोट ठेवताना दिसला होता. गंभीरची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याच्या मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. आता सोमवारी कृणाल पंड्याची विकेट घेतल्यानंतर दिलेली रिएक्शन गंभीरसाठीच असल्याचे चाहत्यांमध्ये बोलले जात आहे. विराटचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (Virat Kohli’s reaction after getting the wicket of Krunal Pandya is going viral on social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्ध विराट कोहलीची नकोशी कामगिरी, मोठा विक्रम करण्याची संधीही हुकली
अमित मिश्रा बनला आयपीएलमधील तिसरा सर्वोत्तम गोलंदाज! मलिंगा, अश्विन आणि चावलाचा विक्रम मोडीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---