लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ची आघाडी घेतली आहे. दरम्यान, हसीब हमीद बाद झाल्यानंतर विराट कोहलीने दिलेल्या रिॲक्शनचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत ४६६ धावांचा डोंगर उभारला होता. यासह इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी ३६८ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स यांनी चांगली सुरुवात करून देत शतकी भागीदारी केली होती. त्यावेळी इंग्लंड संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवून ठेवली होती.
त्यानंतर विराट कोहलीने रवींद्र जडेजाला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. जडेजाने ६२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसीब हमीदला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. हमीद ६३ धावा करत माघारी परतला. दरम्यान, हमीद बाद झाल्यानंतर विराटचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तो हाताने पिपाणी वाजवताना दिसून आला होता. तसेच जोरदार जल्लोष साजरा करताना दिसून आला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/rutvikdesai1502/status/1434871357884416003
https://twitter.com/ForeverVirat018/status/1434877309853388810
Captain Virat Kohli's Celebration. #INDvENG #bumrah #viratkholi #Viral pic.twitter.com/UyfbWKCpvE
— Wasim Akram وسيم اكرم 🇮🇳 (@wasimakram_0786) September 6, 2021
This celebration 🤟 pic.twitter.com/XXngO3jDws
— Virat Kohli FanTeam (@ViratFanTeam) September 6, 2021
https://twitter.com/venkatesh18seka/status/1434913449222361098
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिश धरतीवर ‘या’ भारतीय कर्णधारांनी जिंकलेत कसोटी सामने, ३ विजयांसह विराट अव्वल
‘ओव्हल’चा विजय साधासुधा नाहीये; जो पराक्रम आजवर पाकने तीनदा केलाय, तोच भारताने पहिल्यांदाच केलाय