भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचे तिन प्रमुख खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि युझवेंद्र चहल या सामन्यात विश्रींतीवर असल्याने डगआऊटमधून सामन्याचा आनंद घेत होते. यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या समोर येत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची धुलाई करताना दिसत आहे. चहल भारतीय संघातील एक मजेशीर व्यक्तिमत्व असल्याचे बोलले जाते. संघातील सर्वांसोबत चहल हसून खेळून असल्याचे अनेकदा पाहियला मिळाले आहेत. कर्णधार रोहित आणि चहलचे संबंध अगदी जवळचे असल्याचेही सांगितले जाते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत देखील या दोघांमधील संबंध किती जवळचे आहेत, हे दिसून आले. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) देखील शेजारी बसून या प्रसंगाचा आनंद घेत होता.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील हा प्रसंग आहे. वेस्ट इंडीज संघ फलंदाजी करत असताना 24 व्या षटकात रोहित, चहल, विराट आणि जयदेव उनाडकड (Jaydev Unadkat) हे चौघे डगआऊटमधून सामना पाहत आहेत. यादरम्यानच काही कारणास्तव रोहित चहलच्या पाठीत मजेत ढोसा मारतो. पाहता पाहता रोहित मजे मजेत चहलची चांगलीच धुलाई करतो. शेजारी बसलेला विराट सामना पाहत असून रोहित आणि चहलमध्ये चाललेल्या प्रकाराचा आनंद घेत आहे. चहलची धुलाई केल्यानंतर रोहित आपला चेहरा कॅमेऱ्यापासून लपवतानाही दिसला.
Rohit yaar😭😭 pic.twitter.com/t6rlt6KeLe
— n. (@chupkarjabehen) July 30, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. रोहित आणि विराट हे वरिष्ठ खेळाडू खेळत नसल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यायची जबाबदारी युवा खेळाडूंवर होती. सलामीला आलेल्या ईशान किशन याने 55 धावा केल्या, पण इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. 40.5 षटकांमध्ये 181 धावा करून इंग्लंड संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात यजमान वेस्ट इंडीज संघाने 50 षटकांमध्ये 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. (Virat Kohli’s reaction caught on camera as Rohit Sharma hits Yuzvendra Chahal with his hand)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! मुंबई इंडियन्सने जिंकली नववी ट्रॉफी! फायनलमध्ये कर्णधार पूरनची 137* रन्सची वादळी खेळी
नाबाद 137 धावा करून एमआयला जिंकवणाऱ्या पूरनची रिएक्शन व्हायरल, पाहा एमएलसी 2023ची विनिंग मुव्हमेंट