आधुनिक युगातील महान फलंदाज म्हणून विराट कोहली याची ओळख आहे. विराटने सोमवारी (10 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना अर्धशतक केले. पण त्याने यासाठी डावाच्या शेवटची खूपच संथ खेळी केली, अशी टीका देखील अनेकांनी केली. याच पार्श्वभूमीवर विराटने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना बेंगलोरमध्ये खेळला गेला होता. लखनूने एक विकेट शिल्लक ठेऊन विजय मिळवला. विराटने 44 चेंडूत 61 धावा करत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीची धावसंख्या 212 धावांपर्यंत पोहोचवली होती. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जांयंट्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. विरानेट डावातील 25 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. पण अर्धशतक करण्यासाठी 35 चेंडू लागले. शेवटच्या काही चेंडूंवर विराटला संथगतीने खेळताना पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
याविषयी बोलताना विराट कोहली म्हणाला, “पावरप्ले संपल्यानंतर ते म्हणाले की, यांनी तर अचाणक स्ट्राईक रोटेट करायला सुरुवात केली. पावरप्लेमध्ये विकेट मिळाली नाही तर शक्यतो सर्वश्रेष्ठ गोलेंदाज गोलंदाजीसाठी येतात. या गोलंदाजांविरुद्ध पहिल्या दोन षटकांमध्ये काय केले पाहिजे. त्याच्या शेवटच्या दोन षटकात मोठे शॉट्स खेळले, तर राहिलेली खेळी सोपी असते.”
दरम्यान, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू साइमन डुलने विराट कोहलीच्या या सामन्यातील प्रदर्शनावर निशाणा साधला होता. विराटच्या स्ट्राईक रेटवर सायमनने टीका केली होती. सायमन म्हटल्याप्रमाणे, विराट कोहलीने अर्धशतक करण्यासाठी आपली खेळी संथ केली, ज्यामुळे संघाच्या धावसंख्यावर फरक पडला. विराटने या सामन्यात 61 धाव विकेट गमावल्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाबाद 79, तर ग्लेन मॅक्सवेल याने 59 धावांची खेळी केली होती. शनिवारी (15 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. (Virat Kohli’s response to those criticizing the strike rate, read what he had to say)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराह फिट होणार! बीसीसीआयला पूर्ण विश्वास
अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती