भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो जाहिरातीत देखील झळकत असतो. परंतु अनेकांना माहीत नसेल की, विराट कोहली एक बिजनेसमन देखील आहे. विराट कोहलीच्या मालकीचे ‘वन ८ कम्यून’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ज्याची ब्रांच दिल्ली, कोलकाता आणि पुणेमध्ये आहे. विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर आरोप आहेत की तेथे समलैंगिकांना प्रवेश नाहीये. यावरून सोशल मीडियावर संताप वाढत आहे. ज्यामुळे चाहते देखील संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरोप लावण्यात आले आहे की, विराट कोहलीच्या पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे सुरू असलेल्या ‘वन ८ कम्यून’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये समलैंगिकांना प्रवेश दिला जात नाही. असे म्हटले जात आहे की, समलिंगी पुरुषांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी आहे, तर समलिंगी महिलांना पेहरावाच्या आधारे प्रवेश दिला जातो. भारतातील फॅन्सी रेस्टॉरंट, बार आणि क्लबमध्ये समलैंगिकांविरुद्ध भेदभाव सामान्य आहे आणि विराट कोहलीही तेच करत आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खूप वादविवाद देखील होत होते. विराट कोहलीला देखील नको नको त्या गोष्टी म्हटल्या जात होते. त्यानंतर ‘वन ८ कम्यून’ने याबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व लोकांचे स्वागत करतो आणि त्यांचा आदर करतो. आमच्या नावावरूनच आम्ही सर्व समाजाच्या सेवेत नेहमीच पुढे असतो. इंडस्ट्री ट्रेंड आणि सरकारी नियमांनुसार, आमच्याकडे स्टॅग एंट्रीवर बंदी आहे. याचा अर्थ आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात आहोत किंवा कोणाचाही अपमान करत आहोत असा होत नाही.”
https://www.instagram.com/p/CWTRFDAPccx/?utm_medium=copy_link
What can you expect from WOKE #ViratKohli ?
Progressive in Speech, Regressive in Action.
Can you clarify Mr. @imVkohli & Mrs. @AnushkaSharma on this #homophobic decision ? https://t.co/XIY692bLgb
— Vinay Tiwari (@VinayTiwari_) November 15, 2021
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “तरीदेखील एखादी नको असलेली घटना घडल्यास किंवा चुकीचा संवाद झाल्यास, त्या व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा असे आम्हाला वाटते. जेणेकरुन विवाद योग्य प्रकारे मिटवला जाऊ शकेल. आमचे ग्राहक आमचे प्राधान्य आहेत, त्यांच्याशी मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध निर्माण करणे हा आमच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहित कुशल रणनीतिकार, तर प्रशिक्षक द्रविडमुळे बनेल चांगले सांघिक वातावरण- केएल राहुल
असे ३ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी एकही शतक न ठोकता वनडे क्रिकेटमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा