राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा जगातील सर्वश्रेष्ट फलंदाजपैकी एक असल्याचे म्हटले जाते. तसेच तो त्याच्या जबरदस्त फिटनेससाठीही तो ओळखला जातो. विराटचे अनेकदा त्याच्या फिटनेससाठी कौतुक केले जाते. सध्या त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत तो शर्टलेस दिसत आहे. विराट सध्या त्याचा आयपीएलमधील संघ आरसीबीसोबत यूएईमध्ये आहे. आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हे फोटो शेअर केले आहेत.
आरसीबीची आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चांगली राहिली नव्हती. संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा पहिला आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा दुसरा सामना गमावला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध रविवारी (२६ सप्टेंबर) पार पडलेल्या सामन्यात संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबीने आयपीएल प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
मुंबई विरुद्धच्या विजयाच्या आनंदात असलेल्या आरसीबीचे खेळाडू स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसले आहेत. आरसीबीने ट्वीटरवर फोटो पोस्ट करत खेळाडू स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत असल्याची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कोहलीव्यतिरिक्त इतरही खेळाडू दिसत आहेत. पोस्टमध्ये विराट आणि सर्वच खेळाडू शर्टलेस दिसत आहेत. विराटच्या हातात एक आकर्षक घड्याळही दिसत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
Our boys definitely deserve to cool off after a couple of days of intense #IPL action. 🧊🏊♂️ #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/SNNMwIvxtJ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 27, 2021
तसेच चाहते आरसीबीने केलेल्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काहींना विजयानंतर विराटच्या चेहऱ्यावर पसरलेले हास्य पाहून खूप आनंद झाला आहे. तर एका चाहतीने, ‘सगळी हॉटनेस एकाच संघात भरलीय’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
❤️🔥🔥🔥🔥 pic.twitter.com/E2W2mt366N
— Manobhiram__DHFM (@i_am_DHFM_2) September 27, 2021
THAT NOOR ON HIS FACE 🤩.@imVkohli love u 🌍❣️ pic.twitter.com/sa1PO5uQMl
— Arman Khan (@CHEEKUTHEGOAT) September 27, 2021
Saari hotness ek hi team mai not fair
— zeel ☀️ (@zeelpatel1810) September 27, 2021
KING IS A DIFFERENT VIBE AFTER ALL.Gave is all in last 3 days now deserves to relax most.All the best for the next game @imVkohli love you the most my 🌍🐐👑 pic.twitter.com/MOQiFGCZsx
— Arman Khan (@CHEEKUTHEGOAT) September 27, 2021
Fire 🔥🔥🔥#king
— Med Diagnose (@Nisha_Saini98) September 27, 2021
दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मागच्या काही काळापासून खराब फार्ममध्ये असलेला विराट पून्हा चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. आगामी टी२० विश्वचषकाच्या आधी विराटला फॉर्ममध्ये परतताना पाहून चाहते सुखावले आहेत. तसेच भारतीय संघासाठी ही चांगली बातमी आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे यावर्षी संघ चषक मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच विराटचा हा आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असणार असल्यामुळे तोही जेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला त्याची पाकिस्तानातच बेईज्जती करायची होती’, कैफने सांगितलं कशी केली अख्तरची फजिती?
वॉर्नर तुस्सी ग्रेट हो! ज्या खेळाडूमुळे गेले संघातील स्थान, त्याचीच थोपटली पाठ; बघा व्हिडिओ
Video: केवळ १८ धावांची खेळी केली, पण साहाने त्याच्या ८३ मीटरच्या षटकाराने मिळवली सर्वांची वाहवा