‘द रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा मेणाचा पुतळा 6 जूनला दिल्लीत चाहत्यांना बघायला मिळाला. यामुळे चाहत्यांची चांगलीच गर्दी दिल्लीच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये झाली.
7 जूनला तर एवढ्या लोकांनी पुतळ्यासोबत सेल्फीज् काढल्या ज्यामुळे विराटच्या या पुतळ्याच्या उजव्या कानाला तडा गेला.
यावर तेथील अधिकाऱ्यांनी लगेच तो पुतळा नीट करण्यासाठी वर्कशॉपमध्ये नेला.
Delhiites get a bite of #ViratKohli quite literally at #MadameTussauds PC Statesman pic.twitter.com/FNLARdIQi6
— Bharat Sharma (@sharmabharat45) June 7, 2018
विराटआधी या म्युझियममधील खेळाच्या विभागात कपिल देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे सुध्दा मेणाचे पुतळे आहेत.
हा पुतळा बनवण्यासाठी लंडनच्या मुख्य म्युझियममधून कलाकार आले होते. यासाठी एकूण सहा महिने लागले. तसेच 200 विशिष्ट मोजमाप घेण्यात आले. चेहऱ्याच्या हावभावसाठी अनेक फोटोची मदतही घेण्यात आली.
विराटच्या चाहत्यांनी हा पुतळा बनवण्यासाठी आम्हाला कश्या विनंत्या केल्या हे म्युझियमचे डायरेक्टर अंशूल जैन यांनी सांगितले. तसेच त्यांचा एमएस धोनीचा पण पुतळा बनवण्याचा विचार आहे हे ही सांगितले.