भारतीय संघाचे काही खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारतीय संघाचे गोलंदाज मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. चहल आणि शमी नुकतेच इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते..
यावेळी दोघांनीही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान एका चाहत्याने शमीला (Mohammed Shami) प्रश्न विचारला की, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांमध्ये तुझा चांगला मित्र (Best Friend) कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर शमीने मनमोकळेपणाने दिले.
यावेळी शमी म्हणाला की, रोहितने त्याच्यासोबत कसोटीत पदार्पण केले होते. परंतु तो त्याच्याबरोबर फोनवर अधिक चर्चा करत नाही जितके तो विराटबरोबर करतो. रोहतबरोबर तो चेष्टा करत नाही. यावर चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला की, “रोहित भैय्या घरी असताना कमी बोलतो कारण तो फोनचा कमी वापर करतो.”
शमी पुढे म्हणाला की, “रोहितशी तो जास्त चेष्टा-मस्करी करत नाही. परंतु तो विराटबरोबर अधिक चेष्टा-मस्करी करतो. तसेच फोनवर रोज चर्चाही करतो. तसेच आम्ही एक-दुसऱ्याचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतो. त्यामुळे रोहित आणि विराटमध्ये मी विराटला निवडेल. कारण तो कर्णधार आहे म्हणून नाहीतर त्याच्याशी चर्चा करताना कन्फर्टेबल वाटते म्हणून.
ट्रेंडिंग घडामोडी-
-त्या ऐतिहासिक हॅट्रिकची प्लॅनिंग सांगताना शमी म्हणाला…
-एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
-भारताला १५ वर्षांपुर्वी त्रास देणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर आजही तो विक्रम कायम