एखाद्या क्रिकेटपटूमुळे खुनाचे आरोपी पकडले गेल्याचे तुम्ही क्वचितच ऐकले असेल. आज मी तुम्हाला एका खुणाची काहीणी उलघडून सांगणार आहे. मात्र त्या कहाणीचा हिरो सुप्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली आहे. हो हे खरोखरच घडले आहे. हे प्रकरण बेंगळुरूचे असून हत्येतील आरोपींना अटक करण्यात किंग कोहलीचा मोठा वाटा आहे म्हटलं तरी चालेल. मात्र, खुनाच्या आरोपींना अटक करण्यात कोहलीची प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष भूमिका समोर आली आहे. चला जाणून घेऊ प्रकरण आहे तरी काय.
घडलेले संपुर्ण प्रकरण उघडकीस येण्याचा एकमेव पुरावा म्हणजे ‘किंग कोहली’ (Virat Kohli) हे नाव. वृत्तानुसार, ‘किंग कोहली’ या शब्दामुळे बेंगळुरू (Bangalore) पोलिसांना 82 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपींना पकडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमधून एक ऑटोरिक्षा सापडली ज्यावर ‘किंग कोहली’ असे लिहिले होते. ‘किंग कोहली’ या शब्दाच्या मदतीने पोलीस खुनाच्या आरोपीपर्यंत पोहोचले.
‘किंग कोहली’ नावाची जादू
महालक्ष्मीपुरमची रहिवासी कमला एन राव उर्फ कमलम्मा तिच्या घरात मृतावस्थेत पोलिसांना आढळली. ती वृद्ध महिला एकटीच राहत होती. मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे ही हत्या घडवून आणली असल्याचे पोलिसांनी वृत्त दिले आहे. यावेळी पोलिसांनी माध्यमांना सांगताना म्हटले की, वृद्ध महिलेचे हात-पाय बांधलेले असून तिच्या तोंडाला टेप लावलेला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता खुनाच्या दिवशी सकाळी घराभोवती एक ऑटोरिक्षा वारंवार फिरत असल्याचे निष्पन्न झाले. या ऑटोरिक्षावर ‘किंग कोहली’ असे लिहिले होते, परंतु रिक्षावरती कोणताच नोंदणी क्रमांक नव्हता. हे प्रकरण नंतर उघडकीस आले असले तरी ही हत्या 27 मे रोजी झाल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.
ऑटोरिक्षाचा मागोवा घेत, पोलीस हत्येतील आरोपींपर्यंत पोहोचले ज्यांची ओळख सिद्धाराजू सी एम, प्लंबर आर अशोक, सी अंजनामूर्ती आणि कामाक्षीपल्य अशी आहे. या सर्व आरोपींना शुक्रवारी पोलीसांनी अटकेत घेतले. डीसीपी शिव प्रकाश देवराजू यांनी मीडियाला सांगितले की, आयपीएलमध्ये सट्टेबाजीमुळे आरोपी कर्जबाजारी झाले होते आणि त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी वृद्ध महिलेची (Old Women) निर्घुण हत्या केली. मारेकरी घरामध्ये घुसले होते आणि त्यांनी वृद्ध कमलाचे हात पाय बांधून तिची हत्या केली. यावेळी अशोक घराबाहेर पहारा देत होता. तपासानंतर पोलिसांनी तपशील दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?