भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल मैदानावर खेळला जाईल. लॉर्ड्स कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघाला लीड्समध्ये एका डावाने पराभव पत्करावा लागला. आता 2 सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक लढत होईल.
शेवटच्या वेळी भारतीय संघाने ओव्हलवर 2018 मध्ये कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये इंग्लंडने पाहुण्या संघाचा 118 धावांनी पराभव केला होता. भारतीय कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने पहिल्या डावात अलिस्टर कुक (71), मोईन अली (50) आणि जोस बटलर (89) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 332 धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजाने चार, तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी तीन बळी घेतले होते. पहिल्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली नाही नव्हती. दुसऱ्याच षटकात शिखर धवन फक्त 1 धाव करून स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारताला पुजारा-कोहलीकडून आशा होत्या. पुजाराने 101 चेंडूत 37 धावा केल्या तर विराटने 70 चेंडूत 49 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी खाते न उघडता अजिंक्य रहाणे जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला होता. हनुमा विहारीच्या 56 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 86 धावांमुळे भारत पहिल्या डावात 292 धावा करू शकला होता.
दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ऍलिस्टर कुकने 147 तर कर्णधार जो रूटने 125 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 8 गडी गमावून 423 धावा करत आपला डाव घोषित केला होता. अशा प्रकारे भारताला विजयासाठी 464 धावांचे लक्ष्य मिळाले होते. दुसऱ्या डावातही शिखर धवनने फक्त एक धाव केली आणि अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. अँडरसनने चेतेश्वर पुजाराला खातेही न उघडू देता तीन चेंडूत बाद केले. यानंतर, पुढच्याच षटकात, स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केले. कोहलीने शून्य धावा केल्या.
या सामन्याच्या पहिल्या डावात रहाणे खाते उघडण्यात अपयशी ठरले होता, त्यानंतर दुसऱ्या डावात कोहली-पुजारा शून्यावर गेले. केएल राहुलने 149 आणि रिषभ पंतने 114 धावा केल्या तरी दोन्ही फलंदाज भारताचा पराभव टाळू शकले नाहीत. 345 च्या धावसंख्येवर भारत सर्वबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबी संघासाठी वाईट बातमी! ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून घेतली माघार
सुमीत अंटीलची सुवर्णमय कामगिरी! विश्वविक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे ‘सुवर्णपदक’
‘तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये जाताना रडलो होतो’, श्रेयस अय्यरने सांगितली वेदनादायी आठवण