---Advertisement---

बर्थडे बॉय विराट म्हणतोय, “एक‌‌ आठवड्यानंतर विश्वविजयाचा केक कापायचाय”

On: शनिवार, नोव्हेंबर 5, 2022 3:31 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली शनिवारी ‌(5 नोव्हेंबर) आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवशी जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विराटने देखील या वाढदिवशी भारतीय पत्रकारांसह मेलबर्न येथील प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे वाढदिवस साजरा केला. त्याचवेळी त्याने पुढील आठवड्यात आपण असाच एक मोठा केक कापणार असल्याचे देखील म्हटले.

सध्या जगातील सर्वात उत्तम फलंदाज असलेला विराट सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू देखील आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळत असून संघाची उपांत्य फेरीतील जागा देखील पक्की झालीये. भारतीय संघ 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेविरूद्ध आपला अखेरचा साखळी सामना खेळेल.

तत्पूर्वी,‌‌‌ 5 नोव्हेंबर रोजी विराट आपला ‌‌‌‌34 वा वाढदिवस साजरा करताना दिसला. मेलबन क्रिकेट ग्राउंडच्या स्टॅन्ड्समध्ये काही भारतीय क्रीडा पत्रकारांसोबत त्याने वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील भारतीय संघाचे मेंटल हेल्थ कंडिशनिंग कोच‌ पॅडी अप्टन‌ यांच्या समवेत संपूर्ण भारतीय संघाने त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. त्यानंतर बोलताना विराटने असे देखील म्हटले,

“पुढील आठवड्यात मला एकच मोठा केक कापायचा आहे.”

रविवारी (13 नोव्हेंबर) टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. भारतीय संघाचा फॉर्म पाहता ते अंतिम फेरीत दाखल होऊ शकतात. विराटने वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मात्र, आपला पाचवा टी20 विश्वचषक खेळत असलेल्या विराटला अद्याप टी20 विश्वचषक उंचावण्याची संधी मिळालेली नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही विराट कोहली…
विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा
विराट कोहलीचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!! 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---