Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा

विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा

November 5, 2022
in क्रिकेट
Sachin Tendulkar and Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. संपुर्ण जगभरातून या दिग्गज खेळाडूवर कौतुकाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सध्या विराट विक्रमांचे विक्रम मोडत आहे. तो जो खेळ खेळत आहे त्यात भारताचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अनेक विक्रम केले आहे. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार विराटची आणि त्याने केलेल्या विक्रमांची थेट सचिनशी तुलना होत असते. म्हणुनच या दोन खेळाडूंच्या तिशीतील पराक्रमांचा हा तुलनात्मक लेख. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २४ एप्रिल २००३ रोजी आपला ३०वा वाढदिवस साजरा केला होता.  आपण या लेखात विराट आणि सचिनच्या तिशीतल आकडेवारीचा विचार करणार आहोत.

तिशीत धावांमध्ये कोण सरस- 

सचिनने जेव्हा तिशी पुर्ण केली तेव्हा त्याच्या नावावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळुन ४१९ सामन्यात ४९.१३च्या सरासरीने २१०३० धावा केल्या होत्या. त्यात सचिनच्या नावावर तेव्हा ६५ शतकं आणि ९७ अर्धशतकं होती. विराटच्या नावावर वयाच्या ३०व्या वर्षी ३५१ सामन्यात ५६.५६च्या सरासरीने १८६६५ धावांची नोंद केली गेली होती. यामध्ये त्याच्या ६२ शतकांचा आणि ८५ अर्धशतकांचा समावेश आहे.

तिशी पुर्ण करताना कारकिर्द किती वर्षांची-
२४ एप्रिल २००३ रोजी जेव्हा मास्टर ब्लास्टरने वयाची तिशी पुर्ण केली तेव्हा सचिनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १३ वर्ष ५ महिने आणि ९ दिवसांची होती. या काळात टीम इंडिया ४८२ आंतरराष्ट्रीय सामने खेळली. त्यातील ४१९ सामन्यात सचिनला खेळण्याची संधी मिळाली होती.

तर दुसरीकडे विराट कोहलीने वयाची ३० वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १० वर्ष २ महिने आणि १८ दिवसांची होती. जवळपास विराटची तिशीतील कारकिर्द सचिनपेक्षा ३ वर्ष आणि ३ महिन्यांनी कमी असुन एकुण धावांमध्ये विराट २३६५ धावांनी सचिनपेक्षा मागे आहे. या काळात टीम इंडिया सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून एकुण ४६५ सामने खेळली. त्यात विराटने ३५१ सामन्यात भाग घेतला.

कसोटीत कोण सरस-
वयाची तिशी पुर्ण केली तेव्हा सचिनच्या नावावर कसोटीत १०५ सामने होते. त्यात सचिनने ५७.५८च्या सरासरीने ८८११ धावा केल्या होत्या. तेव्हा कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन ६व्या स्थानी होता.

तर दुसरीकडे वयाच्या तिशीमध्ये विराटच्या नावावर ७३ कसोटी सामने होते. त्यात त्याने ५४.५७च्या सरासरीने ६३३१ धावा केल्या होत्या. या काळात विराट सचिनपेक्षा कसोटीत जवळपास ३२ सामने कमी खेळला.

वन-डेतही सचिनच पुढे?
सचिनने जेव्हा वयाची तिशी पुर्ण केली तेव्हा सचिनच्या नावावर वनडेत ३१४ सामन्यात ४४.४३च्या सरासरीने १२२१९ धावा होत्या. तेव्हा सचिनच्या नावावर ३४ शतकं आणि ६४ अर्धशतकं होती.

विराटच्या नावावर वयाच्या तिशीमध्ये २१६ वन-डे सामन्यात ५९.८३च्या सरासरीने १०२३२ धावा केल्या आहेत. सध्या वन-डे विराटच्या नावावर ३८ शतकं आणि ४८ अर्धशतकं आहेत.

वयाची तिशी पुर्ण करण्यापुर्वी १० हजार धावा-

वयाची तिशी पुर्ण करण्यापुर्वी विराटने वन-डेत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे तर सचिननेही वनडेतच १० हजार धावांचा टप्पा पार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

–Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा

–जे कोणत्याही कर्णधाराला जमले नाही ते रोहित शर्माने करुन दाखवले

–पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा विंडिजवर ५ विकेट्सने विजय

 

 


Next Post
Virat kohli v pak

या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही विराट कोहली...

roger binny shahid afridi

रॉजर बिन्नींनी केली शाहिद आफ्रिदीची बोलती बंद, 'बीसीसीआयलाही इतरांप्रमाणे समान वागणूक मिळते'

Photo Courtesy: Twitter/BCCI

भारताचा माजी कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक

Please login to join discussion

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143