एमसीए स्टेडियम गहुंजेवर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध झारखंड सामना सुरु आहे. या सामन्यात झारखंडने पहिल्या डावात सर्वबाद 403 धावा केल्या तर महाराष्ट्राने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 1 बाद 149 धावांपर्यंत मजल मारली आहे. झारखंडकडून कर्णधार विराट सिंगने शानदार फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीमुळे झारखंडने 403 धावांचा टप्पा गाठला.
सिंगने केली ‘विराट’ खेळी
झारखंडचा कर्णधार आणि उदोयन्मुख क्रिकेटर विराट सिंग(Virat Singh) याने जबरदस्त खेळी केली. त्याने 171 चेंडूत 108 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. कूमार सूरजने 83 धावांची खेळी करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. 26 वर्षीय विराटचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 10वे शतक ठरले. या डावात झारखंड संघाच्या शेपटीने मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजीला चांगलेत दमवले. 353 धावांवर 8 विकेट गेलेल्या असताना शेवटच्या दोन विकेट्सने 50 धावांची भागीदारी केली. (Virat Singh Scored 100 against Maharashtra in Ranji Trophy at MCA Stadium, Gahunje, Pune)
हितेश वाळूंजने गाजवले मैदान
आपल्या दूसऱ्याच सामन्यात हितेश वाळुंजने(Hitesh Walunj) आपल्या होम ग्राउंडवर झारखंडच्या फलंदाजीचे कंबरटे मोडले. त्याने झारखंडच्या पहिल्या डावात तब्बल 6 विकेट्स घेतल्या. त्याने 33.2 षटकांत 91 धावा देत, 6 विकेट्स घेतल्या. यात झारखंडचा कर्णधार विराट सिंगच्या विकेटचाही समावेश होता. आशय पालकरने 2 तर प्रदीप दाधे आणि आर. घोष यांनी 1-1 विकेट घेत हितेशची चांगली साथ दिली.
सामना एकदम बरोबरीत
झारखंडच्या प्रत्यूत्तरात महाराष्ट्रानेही एकदम चांगली सूरूवात केली आहे. दूसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राची धावसंख्या 149 धावांवर 1 बाद अशी आहे. यात पवन शाहा 64 तर नौसाद शेख 63 धावांवर नाबाद खेळत आहेत. झारखंडकडून आशिष कूमारने 1 विकेट घेतली घेतली. आता महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव(Kedar Jadhav), अंकित बावणे व इतर फलंदाज कशी कामगिरी कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष राहील.
इतर बातम्या –
IND vs AFG: ही तर धोनीची कृपा! सामनावीर ठरल्यानंतर शिवम दुबेने दिले कॅप्टन कुलला श्रेय
Bangladesh Cricket । नजमूल हसन यांचा मोठा निर्णय! सोडणार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद