बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे.
हा सामना आता रंगतदार स्थितीत पोहचला असताना भारत आणि इंग्लंडला या सामन्यात विजय मिळवण्याची समान संधी आहे.
इंग्लंडने या सामन्यात भारतासमोर विजयासाठी १९४ धावांचे आव्हान दिले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडच्या १९४ धावांचा पाठलाग करताना ५ बाद ११० धावा केल्या होत्या.
यावेळी विराट कोहली नाबाद ४३ आणि दिनेश कार्तिक नाबाद १८ धावांवर खेळत होते.
आज भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर विराट कोहलीची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
तसेच यावेळी कोहलीकडे भारताला विजय मिळवून देण्यासह भारताचे दिग्गज माजी कर्णधार एमएके पतौडी आणि सौरव गांगुलीला मागे टाकत खास विक्रम करण्याची संधी असणार आहे.
यापूर्वी इंग्लंडमध्ये भारताचा कर्णधार म्हणून फलंदाजी करताना एका कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम एमएके पतौडी यांच्या नावावर आहे. त्यांनी लिड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर १९६७ साली झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून ५५४ चेंडूंचा सामना केला होता.
एमएके पतौडीनी यातील पहिल्या डावात २०६ चेंडूंचा सामना करत ६४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ३४८ चेंडूंचा सामना करत १४८ धावांची शतकी खेळी केली होती.
Most balls faced by an Indian captain in England in a Test match
554 – MAK Pataudi @ Leeds 1967
308 – Sourav Ganguly @ Nottingham 2002
301* – Virat Kohli @ Birmingham 2018#ENGvIND#INDvENG— Mohandas Menon (@mohanstatsman) August 3, 2018
तर कर्णधार म्हणून फलंदाजी करताना इंग्लंडमध्ये एका कसोटी सामन्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावे आहे.
सौरव गांगुलीने इंग्लंड विरुद्ध 2002 साली झालेल्या नॉटिंघहॅम येथील सामन्यात कर्णधार म्हणून एमएके पतौडी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक ३०८ चेंडूंचा सामना केला होता.
यामध्ये गांगुलीने पहिल्या डावात १४९ चेंडूच ६९ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १५९ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या.
गुरुवारपासून (१ ऑगस्ट) सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून फलंदाजी करताना विराट कोहलीने दोन्ही डावात मिळून ३०१ चेंडूंचा सामना केला आहे.
यातील पहिल्या डावात २२५ चेंडूचां सामना करत १४९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात विराट ७६ चेंडूमध्ये नाबाद ४३ धावांवर खेळत आहे.
त्यामुळे या सामन्याच्या चौथ्या दिवशी विराटला माजी कर्णधार एमएके पतौडी आणि सौरव गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून एका सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याची संधी असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
-टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम