---Advertisement---

शिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 11:23 PM
---Advertisement---

मागच्या काही काळापासून भारतीय संघात असे काही खेळाडू सहभागी झाले आहेत, जे त्यांच्या मजा-मस्करी करण्याच्या स्वभावासाठी ओळखले जातात. हे खेळाडू त्यांच्या या स्वभावामुळे ड्रेसिंग रूम नेहमी आनंदी ठेवतात. भारताच्या काही वर्षांपूर्वीच्या संघाचा विचार केला तर त्यात हरभजन सिंग, इरफान पठान आणि युवराज सिंग हे संघात सर्वांशी मस्ती करणारे खेळाडू म्हणून ओळखले जायचे. आताच्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात शिखर धवन, हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि अन्य काही खेळाडू ही भूमिका पार पाडत आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेर खूप मस्तीखोर आहे. शिखर धवन आणि इशांत शर्मासोबत त्याची खुपच चांगली दोस्ती आहे. या तिघांनी दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट सोबत खेळले आहे. १९ वर्षाखालील संघापासून त्यांचे नाते आणखीनच घट्ट झाले. विराट कोहली आणि इशांत शर्मा यांच्यापेक्षा शिखर धवन वरिष्ठ आहे. मात्र, दिल्लीच्या संघात हे खेळाडू सोबतच खेळले होते.

विराट कोहलीने २०१७ मध्ये ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात त्याच्या संघातील सहकाऱ्यांबाबत अनेक खुलासे केले होते. याच कार्यक्रमात त्याने शिखर धवनचा एक किस्सा सांगितला. कोहली त्याच्या दिल्लीच्या संघातील एका नव्या सहकाऱ्याला त्रासला होता. त्याचे कारण होते, की हा खेळाडू त्याच्या क्रिकेटच्या सामानाचे कौतुक करत होता. ही गोष्ट कोहलीला आवडत नव्हती की, संघात नवीन खेळाडू आला आहे आणि त्याचे जास्तच कौतुक करत आहे.

विराटने ही गोष्ट शिखर धवनला सांगितली. शिखर धवनचे यावरचे उत्तर ऐकून विराट आणि यष्टीरक्षक मैदानावर लोटपोट झाले. उत्तर देताना धवन म्हणाला, “हो यार, तो खेळाडू ठीक आहे, पण प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये येण्याचा प्रयत्न करतो.” यावेळी शिखरला नोटबुक ऐवजी गुडबुक म्हणायचे होते. धवनच्या या चुकीच्या इंग्रजीमुळे विराट आणि यष्टीरक्षक जोर-जोरात हासू लागला. कोहली कार्यक्रमात हा किस्सा सांगतानाही हसत होता.

Virat Kohli On Dressing Room Music, Dhawan's Humour, his Salesman Skills & Dhoni I BwC S4E1 | Part 1

तिसऱ्या कसोटी सामन्यात चाहत्यांची विराटकडून शतकाची अपेक्षा
सध्या इंग्लंड विरुद्ध भारत अशी ५ सामन्याची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. मालिकेतील दोन सामन्यांनंरत भारतीय संघने १-० अशा आघाडीवर आहे.  भारताचा कर्णधार मागच्या बऱ्याच काळापासून शतकी खेळी करू शकला नाही. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा हा शतकाचा दुष्काळ संपेल अशी चाहत्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानला झटका! फलंदाजी करताना फवाद आलम कोसळला खेळपट्टीवर, रिटायर्ड हर्ट होऊन जावे लागले मैदानाबाहेर

पाकिस्तानी एँकरही झाली मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची फॅन; म्हणाली, ‘तो वर्ल्ड क्लास गोलंदाज बनत चाललाय…’

‘दिग्गज असतात ते, असे बसतात’, पृथ्वी शॉला ‘हिटमॅन’च्या मांडीवर बसलेलं पाहून जाफरला सुचली मस्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---