ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघाने ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. ऍडलेडमध्ये अवघ्या ३६ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने मेलबर्नमध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर सिडनी कसोटी राग अनिर्णित राखली. शेवटी, ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रोमांचक शैलीत कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघाच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात हा विजय प्रेरणादायी असल्याचे म्हटले होते. मात्र, मोदी यांच्या या प्रशंसेनंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.
पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले होते. मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केल्या गेलेल्या ट्वीट मध्ये लिहिले होते, ”या महिन्यात क्रिकेटच्या खेळपट्टीवरून खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणींनंतर शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. खेळाडूंची मेहनत आणि संघकार्य प्रेरणादायक आहे.”
विराट झाला ट्रोल
पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्वीटला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने रिट्विट करत भारतीय ध्वजाची इमोजी पोस्ट केली. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, ”अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा विजय मिळवला गेला आहे. तू त्याचे श्रेय घेऊ नकोस.” अन्य एका चाहत्याने लिहिले की, ”तू स्वतः या प्रवाहापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.”
Why??? you were the one who left the team bleeding and down on knees. And now running here and there for credit??
— Babu Saheb (@__desiguy) January 31, 2021
https://twitter.com/_Sprinter_0/status/1355792521461444609
भारतात परतला होता विराट
ऍडलेड कसोटीनंतर विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला होता. त्याची पत्नी अनुष्का शर्मा आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याने, विराटला तिच्यासोबत राहायचे होते. यानंतर अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व स्वीकारत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र, विराट कोहली भारतातून सतत संघाच्या संपर्कात होता.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! बडोद्याचा पराभव करत तामिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय
खुशखबर! चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इतक्या प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश