भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या वैयक्तिक कारणास्तव संघातून बाहेर आहे. भारत आमि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विराटने माघार घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी माजी कर्णधार संघात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण विराट संघात परत येईपर्यंत भारतीय संघ मालिकेत खूप मागे पडू नये असी शंका माजी भारतीय दिग्गजाने व्यक्त केली आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारी रोजी सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. जयमान भारतीय संघ या सामन्यात 28 धावांनी पराभूत झाला. शेवटच्या डावात बारताला विजयासाठी 231 धावा हव्या होत्या. पण इंग्लंडच्या टॉम हार्टली याने पदार्पणाच्या सामन्यात शेवटच्या डावात 7 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी भारतासाठी या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतके केली. पण दुसऱ्या डावात एकही फलंदाज अर्धशतकापर्यंत पोहोचू शकला नाही. रोहितच्या नेतृत्वातील संघाला पहिल्याच कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) याची कमी जाणवली. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय फलंदाज मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांने विराट आणि संघातील इतर फलंदाजांबाबत खास प्रतिक्रिया दिली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कैफ म्हणाला, “मला असे वाटत आहे की, भारताचा वनडे संघ कसोटी क्रिकेट खेळत आहे. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे सर्व केळाडू मोठे स्ट्रोक मारणारे आहेत. गिलला शॉट खेलायला आवडतात पण स्वतःच्या डिफेंसवर त्याला तितका विश्वास नाहीये. त्यामुळे त्याला आपली डिफेंस करण्याची पद्धत बदलावी लागू शकते. श्रेयस अय्यर देखील आक्रामक खेळाडू आहे. आशा आहे की, तिसऱ्या कसोटीत विराट येईपर्यंत खूप उशीर झाला नसावा. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी अजूनच कमजोर होत आहे, यात शंकाच नाही.”
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होणार आहे. मालिकेतील या सामन्यात भारताकडे फलंदाजांची कमी आहे. विराटपाठोपाठ केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी दुखापतीमुले दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात या दोघांचे योगदान महत्वाचे राहिले होते. (Virat’s comeback will be delayed! Why did the former legend say this before the Visakhapatnam Test?)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ACCच्या अध्यक्षपदी शहांची फेरनिवड, ICC अध्यक्षपदाबाबत संभ्रम
आईविषयी चुकीच्या बातम्यांनी संतापला विराटचा भाऊ, गैरसमज दूर करण्यासाठी केली इस्टा पोस्ट