भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेसोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलाही सुरूवात झाली आहे. भारतासाठी या स्पर्धेची सुरूवात चांगली म्हणता येणार नाही. कारण भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना पहिला सामना पावसामूळे अनिर्णीत घोषित करण्यात आला. त्यानंतर आयसीसीने भारत आणि इंग्लंड संघांनी सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्याने त्यांना दंडही ठोठवण्यात आला. यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या आधी पत्रकार परिषदेत याविषयी त्याने वक्तव्य केले आहे. या प्रकरणी एक संघ म्हणून आम्ही खुश नाहीत. कारण या गोष्टी नेहमी आपल्या हातात नसल्याचे त्याने सांगितले आहे.
विराट म्हणाला, “आम्ही दुसऱ्या डावाच्या अंती बरीच षटके टाकली. मात्र आम्ही दोन षटके मागे राहिलो. मुळात आम्हाला तेच करायचे होते. आम्हाला खेळाचा वेग कायम ठेवाण्याची गरज होती. सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी जेथे आम्ही 10-15 सेकंद वाचवू शकत होतो, त्या महत्वाच्या होत्या. आम्ही दुसऱ्या डावात यावर प्रयत्न केले आणि 3-4 षटके कव्हर करू शकलो. एकंदरित आम्हाला जे करणे शक्य होते, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यापद स्पर्धेच्या नियमांप्रमाने अनुच्छेद 16.11.2 नुसार एका संघाला एका षटकासाठी कमीत कमी 1 अंकाचा दंड होऊ शकतो. उभय संघांनी 2 षटके कमी टाकल्याने त्यांचे प्रत्येकी 2 गुण कापण्यात आले आहेत. तसेच त्यांना सामना शुल्काच्या 40 टक्के दंड आकारण्यात आला आहे. कर्णधार जो रुट आणि विराट कोहली या दोघांनाही यासाठी जबाबदार ठरवले गेले होते. दोन्ही कर्णधारांनी त्यांची चुक मान्य केली आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीपूर्वी लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे, भारतीय फलंदाजांचा लागणार कस
परदेशी लीगमध्ये भारतीय महिला अष्टपैलूचा कहर; २ विकेट्स चटकावल्यानंतर पाडला धावांचा पाऊस