---Advertisement---

विराटचा विक्रम! IPL मध्ये 1000 बाउंड्री पूर्ण करणारा ठरला पहिला खेळाडू

On: गुरूवार, एप्रिल 10, 2025 8:58 PM
Virat Kohli 3
---Advertisement---

विराट कोहलीने आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये इतिहास रचलेला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुरुवार रोजी 22 धावांची पारी खेळली. विराटने यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी फलंदाजी करताना 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. विराटने तेव्हा आयपीएलमध्ये 1000 बाउंड्री पूर्ण करण्याचा विक्रम केलेला आहे. तो हा विक्रम करणारा आयपीएल इतिहासात पहिला खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये फक्त आरसीबी संघासाठी सामने खेळले आहेत. त्याने 2008 पासून आतापर्यंत 248 सामने खेळले आहेत. यादरम्यान 721 चौकार आणि 279 षटकार झळकावले आहेत. विराटने या प्रकारे 1000 बाउंड्री पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करणारा. तो पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे, धवनने आयपीएलमध्ये 920 बाउंड्री ठोकल्या आहेत. तसेच सर्वात जास्त चौकार ठोकण्याच्या यादीत शिखर विराटपेक्षा पुढे आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त बाउंड्री ठोकणाऱ्या टॉप 5 खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय खेळाडू आहेत. कोहली, धवन याच्या सोबतच या यादीत रोहित शर्मा सुद्धा सामील आहे. रोहितने आयपीएलमध्ये 256 सामने खेळले आहेत. त्यादरम्यान 282 षटकार आणि 603 चौकार झळकावले आहेत. रोहितने एकूण 885 बाउंड्री पूर्ण केल्या आहेत. तो या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे, वॉर्नरने 899 बाउंड्री झळकावल्या आहेत. क्रिस गेल यामध्ये पाचव्या स्थानी आहे. त्याने 761 बाउंड्री ठोकल्या आहेत.

विराट स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत टॉपच्या स्थानी आहे. त्याने 8910 धावा केल्या आहेत. यादरम्यान 8 शतक आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची सर्वश्रेष्ठ खेळी 113 धावांची आहे. तसेच शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने 6769 धावा केल्या आहेत. रोहित 6666 धावा करून तिसऱ्या स्थानी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---