---Advertisement---

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा जिंकताच विराटची राहुल गांधींसाठी खास पोस्ट? सर्वत्र रंगली एकच चर्चा

On: रविवार, मे 14, 2023 4:03 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहली चाहत्यांच्या अपेक्षेवर खरा उतरताना दिसत आहे. दुसरीकडे राजकीय चर्चांना देखील गती आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने बाजी मारली. अशातच असे सांगितले जात आहे की, विराट कोहली याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर यामागचे सत्य जाणून घेऊ.

राहुल गांधी (Rahul Gandhi) मागच्या जुलै 2019मध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडले. पण आजही राहुलकडे काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणूनच पाहिले जाते. कर्नाटक विधानसभा जिंकल्यानंतरही या विजयाचे श्रेय बऱ्याच अंशी राहुलला दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहली (Virat Kohli) याने राहुलला सुभेच्छा दिल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीचा स्क्रिनशॉटही व्हायरल होत आहे.

“द मॅन, द मिथ, द लिडर, राहुल गांधीं.” असे या स्टोरीचे कॅप्शन आहे. स्टोरी विराटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केली गेल्याचे, सांगितले जात आहे. यामध्ये हातात माईक पकडेलेल्या राहुलच्या चेहर्यावर हास्य पाहायला मिळत आहे. विराटची ही स्टोरी पाहून त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांना आश्चर्य वाटले. कारण यापूर्वी त्याने कधीच कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन किंवा आपली विचारसरणी सर्वाजनिक केली नव्हती. अशात या इंस्टाग्रमा स्टोरीची चर्चा होणे सहाजिकच आहे. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार विराटची ही व्हायरल होत असलेली स्टोरी कोणीतरी एडिट केलेली आहे. विराटने अशी कोणतीच स्टोरी शेअर केली नाहीये. असे असले तरी सोशल मीडियावर याविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. विराट आणि राहुलचे चाहते याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

https://twitter.com/imraaz85/status/1657316532567908353?s=20

https://twitter.com/epanchjanya/status/1657327082630942720?s=20

https://twitter.com/mpathakIANS/status/1657313824909967360?s=20

https://twitter.com/shaandelhite/status/1653111927630106624?s=20

सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात विराट कोहली याने 11 डावांमध्ये 42.00च्या सरासरीने आणि 133.75च्या स्ट्राईक रेटने 420 धावा केल्या आहेत. नाबाद 82 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.11 पैक 6 सामन्यांमध्ये विराटने अर्धशतकं केली आहेत. विराट कोहलीचा आरसीबी संघ रविवारी (14 मे) राजस्थान रॉयल्ससोबत हंगामातील आपला 12 वा सामना खेळेल. (Virat’s special post for Rahul Gandhi as Congress wins Karnataka Assembly? The same discussion was everywhere)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामनावीर ठरलेल्या प्रेरक मांकडला प्रेक्षकांकडून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न, जॉन्टी रोड्सकडून मिळाली नवीन माहिती
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार स्टेज 4च्या कॅन्सरने ग्रस्त; प्रार्थना करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांची चाहत्यांकडे मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---