---Advertisement---

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार स्टेज 4च्या कॅन्सरने ग्रस्त; प्रार्थना करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांची चाहत्यांकडे मागणी

On: रविवार, मे 14, 2023 1:04 PM
Heath Streak
---Advertisement---

झिम्बाब्वेचा माजी पुर्व प्रशिक्षक अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक, सध्या जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार स्ट्रीकला उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. झिम्बाब्वेचे क्रीडा मंत्री डेविड कोल्टर्ट यांनी आपल्या पर्सनल अकाउंटवर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने स्ट्रीकच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहन देखील यावेळी केले.

झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्र्यांनी लिहिले की, “हीथ स्टीक (Heath Streak) आयुष्याच्या अंतीम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्याचे कुटुंब यूकेमधून दक्षिण आफ्रिकेला येत आहे. असे वाटत आहे की, आता त्याला फक्त एखादा चमत्कारच वाचवू शकेल.” ते पुढे म्हणाले की, “आपल्या देशाच्या महान क्रिकेटरांच्या यादीतील नाव म्हणजे, हीथ स्ट्रीक ज्यांना आपल्या प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. आपण सर्वजण त्याच्या आणि त्याच्या परिवारासाठी प्रार्थना करत राहू.”

जवळच्या मित्रानेही केली पोस्ट
दरम्यान, झिम्बाब्वेमधील क्रिकेटर आणि स्ट्रीकचा जवळचा मित्र शॉन विलियम्सने एका क्रिकेट वेबसाईटवर त्याची प्रतिक्रिया देत म्हटलं की, “स्ट्रीकला कोलन आणि लिवर कॅन्सर असून तो आत्ता चौथ्या स्टेजवर पोहोचला आहे. मला फक्त एवढचं माहिती की, स्ट्रीकच्या परिवाराने लवकरात लवकर दक्षिण आफ्रिकेला त्याच्या जवळ असावं. मी स्ट्रीकला मेसेज सुद्धा केला होता आणि त्यावर त्याने रिप्लाय सुद्धा दिला. मात्र, आता त्याच्या परिवाराने एकत्र वेळ घालवायला हवा. मला असे वाटते की, कॅन्सर खूप लवकर पसरत आहे. कारण मागील आठवड्यातच स्ट्रीक मासेमारीसाठी गेला होता.

पुढे बोलताना विल्यम म्हणाला की, स्ट्रीक माझे गुरु आहेत आणि त्यांनी प्रत्येकासाठी काही तरी चांगल करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. खरं तर, मी आज ज्या ठिकाणी आहे त्याचे सर्व श्रेय माझ्या गुरुला जाते. झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासातील 100 विकेट घेणारे स्ट्रीक पहिले क्रिकेटर आहेत. राजीनाम्यानंतर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने स्ट्रीकला आठ वर्षांची बंदी घातली. आपली चुक मान्य करत स्ट्रीकने याची सर्व जबाबदारी घेतली आणि सर्वांची माफी देखील मागितली. मात्र, मी कधीही मॅच फिक्सींगमध्ये सहभागी नव्हतो असंही यावेळी सांगितल. (Former Zimbabwe captain Heath Streak suffers from stage 4 cancer, only a miracle can save him)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफ शर्यतीतून बाहेर! जाणून घ्या इतर संघांसाठी कसे आहे समिकरण  
‘हा’ होता मॅचचा टर्निंग पॉइंट! दिल्लीला हरवल्यानंतर शिखर धवनची खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---