---Advertisement---

‘बचपन का प्यार मुझे…’, गाण्याची अनुष्कालाही भुरळ; इशांत शर्माच्या पत्नीच्या मीमवर दिली भन्नाट प्रतिक्रिया

On: गुरूवार, जुलै 29, 2021 9:11 PM
---Advertisement---

सध्या सहदेव या एका लहान मुलाने म्हटलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणं सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या गाण्याने अनेक लोकांना त्याचबरोबर सेलिब्रिटींना देखील भुरळ घातली आहे. या गाण्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला देखील वेड लावले आहे.

अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केले आहे, त्यामध्ये असे दिसून येते आहे की एक व्यक्ती रात्री झोपायचा प्रयत्न करीत आहे, पण सहदेवचे गाणे त्या व्यक्तीच्या मनातून जात नाही, यामुळे त्याला झोप देखील लागत नाही. खरंतर ही पोस्ट इशांत शर्माची पत्नी आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंगने शेअर केली होती, ज्यात तिने अनुष्का आणि अथिया शेट्टीला टॅग केले होते. हीच पोस्ट नंतर अनुष्काने रिपोस्ट केली. तसेच अनुष्काने हसणारा इमोजी शेअर केला आहे.

खरं तर हे गाणे मुळात कमलेश बरोत नावाच्या गायकाने गायले होते, पण सहदेव या मुलाने त्याच्या शाळेत हे गाणे गायल्याने खूप लोकप्रिय झाले आहे. सहदेव नावाच्या मुलाने हे गीत आपल्या शिक्षक आणि वर्गमित्रांसाठी गायले. या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याला त्यांच्याबरोबर गाण्याची ऑफरही दिली.

Photo Courtesy: Instagram/anushkasharma

जेव्हा आपण या मुलाचा व्हिडिओ पाहतो, तेव्हा दिसते की हा मुलगा सरळ कॅमेर्‍यामध्ये पहात आहे आणि हे गाणे एका आवाजात ओरडून म्हणत आहे. बुधवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या मुलाचा गौरव केला आहे. एकूणच काय तर या मुलाच्या व्हिडिओवर बर्‍याच व्यक्तींनी चर्चा केली आहे की, हा व्हिडिओ अगदी खास बनला आहे.

https://www.instagram.com/p/CQ275H3DbpZ/

दुसरी गोष्ट म्हणजे सध्या अनुष्का शर्मा पती विराट कोहली सोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. तसेच प्रतिमाही इशांतसह इंग्लंडमध्ये असून अथिया शेट्टी देखील तिथे आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला ४ ऑगस्ट पासून कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू सरावात व्यस्त आहेत.

प्रतिमा सिंग बद्दल बोलायचे झाले तर, प्रतिमा ही राज्यस्तरीय बस्केटबॉल खेळाडू आहे. तिने काही दिवसांपूर्वीच केएल राहुल आणि अथिया शेट्टी सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ईशांत शर्मा देखील दिसून येत होता.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला सेलर नेत्राने लेजर रेडियलच्या ८ व्या शर्यतीत पटकावला ‘हा’ क्रमांक

श्रीलंका संघात खळबळ! ‘त्या’ व्यक्तीचा हट्टामुळे मिळेना युवा खेळाडूंना संधी

जेष्ठ पत्रकाराने टोकियो ऑलिंपिकमधील कोरियन खेळाडूंबद्दल केली वंशद्वेषी टिप्पणी, झाली ‘ही’ कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---